मराठी संस्कृती जपणाऱ्या डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी, तरुणाला अमानुषपणे मारहाण

डोंबिवलीत मराठी संस्कृती जपली जाते, असं मानलं जातं. डोंबिवलीत गुढीपाडव्याला निघणारी शोभा यात्रा ही सर्वश्रूत आहे. पण मराठी संस्कृती जपणाऱ्या डोंबिवलीत मराठी माणसालाच काही परप्रांतीय फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय.

मराठी संस्कृती जपणाऱ्या डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी, तरुणाला अमानुषपणे मारहाण
किरकोळ कारणातून पतीकडून पत्नी आणि मुलावर हल्ला
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 5:39 PM

ठाणे : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर हा प्रचंड रहदारीचा आहे. जे नागरीक डोंबिवलीला राहतात किंवा ज्यांनी डोंबिवली पाहिलीय त्यांना कदाचित ठावूक असेल की डोंबिवली परिसरात किती गर्दी असते. तो परिसर किती रहदारीचा आहे, त्याचा त्यांना अनुभव असू शकतो. पण असं असतानाही रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी काही केल्या कमी होताना दिसत नाही. डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. फेरीवाल्यांच्या मुजोरीच्या घटना याआधीदेखील समोर आल्या आहेत. या फेरीवाल्यांना प्रशासनाची भीती नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. विशेष म्हणजे यावेळी फेरीवाल्यांनी एका तरुणाला लाथा-बुक्क्यांनी तसेच बांबूने निर्घृणपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर दोन फेरीवाल्यांनी एका पादचाऱ्याला लाथाबुक्की, बांबूने काल बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. स्टेशन परिसरातून चालत जाताना रस्त्यावरचे सामान थोडे बाजूला घ्या, चालताना अडचण होते, असे सांगितल्याने दोन फेरीवाल्यांनी एका पादचाऱ्याला मारहाण केली. जितलाल रामआश्रय वर्मा, श्रीपाल रामआश्रय वर्मा अशी आरोपी परप्रांतीय फेरीवाल्यांचे नावं आहेत. नरेश चव्हाण असे जखमी मराठी पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी सध्या रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी

डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसरात इंदिरा चौक, कामथ मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, मधुबन सिनेमा गल्ली ही आपल्या मालकीची आहे, अशा अविर्भावात ठराविक फेरीवाले या भागात दहशतीचा अवलंब करुन व्यवसाय करतात. परप्रांतीय फेरीवाल्यांची इथे अनेक वर्षांपासून दादागिरी सुरु आहे. नागरिकांनी फेरीवाल्यांना बाजुला बसण्यास सांगितले की, फेरीवाले संघटितपणे कर्मचारी किंवा नागरिकाला घेरुन त्याच्याशी उद्धट वर्तन करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. असाच प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

डोंबिवली स्टेशन जवळील मधुबन टॉकीज जवळ रस्त्यात आरोपी जितलाल रामआश्रय वर्मा, (वय २३ वर्षे) आणि श्रीपाल रामआश्रय वर्मा (वय २५ वर्षे) यांनी धंदा लावला होता. भर रस्त्यात धंदा करत असल्याने फिर्यादी नरेश चव्हाण यांनी सामान थोडेसे बाजूला घेण्यास सांगीतले. यांनतर फिर्यादी आणि आरोपी फेरीवाले यांच्यात वाद झाला आणि राग मनात धरून फिर्यादी चव्हाण यांना शिवीगाळ करण्यात आली.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपींनी लाकडी बांबुने फिर्यादी यांचे उजव्या खांद्यावर, नाकाला, छातीवर ,पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत नरेश चव्हाण हे जखमी झाले आहेत. दरम्यान मारहाण करण्याऱ्या दोघा फेरीवाल्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.