उल्हासनगर : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन दिवसाचे रात्र आणि रात्री दिवस करून काम करत आहे. त्यामुळे च अनेक गुन्हे निकाली निघत आहेत आणि गुन्हेगारंना पकडं जात आहे. त्यामुळे राज्यात गुन्हेगांवर अंकुश ठेवण्याचे काम पोलिसांकडून होताना दिसत आहे. तर अनेक गुन्ह्यांचा तपास सुरू असून अनेकांचा तपास पुर्ण झाला आहे. असाच एका तपासात उल्हासनगर पोलिस (Ulhasnagar Police) गुंतले होते. तब्बल दोन वर्षांनी एका मुलीसह तिच्या बाळाची पश्चिम बंगालमधून (West Bengal) सुटका करण्यात हिललाईन पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. उल्हासनगरात लग्नाचं आमिष (The lure of marriage) दाखवून त्या मुलीला पळवून नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिची सुटका करण्यात आली आहे. तर पश्चिम बंगालमधून या मुलीसह तिच्या बाळाला सुखरूप परत आणत आलं आहे. तसेच तिला पळवून नेणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाल गाव आहे. या गावातील हसीपुर रहमान यांच्या अल्पवयीन मुलीला एका इसमाने पळवून नेलं होतं. याबाबत २० जून २०२० रोजी हिललाईन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातून या मुलीची आणि तिच्या लहान बाळाची सुखरूप सुटका केली. तर तिला पळवून नेणाऱ्या मोहम्मद शेख उर्फ अली याला बेड्या ठोकल्या. यानंतर या मुलीसह तिच्या बाळाला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं असून आरोपी मोहम्मद याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे.