Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये नगरसेवकाची दुकानदाराला मारहाण?, हिललाईन पोलिसांनी दाखल केला मारहाणीचा गुन्हा

उल्हासनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काही दिवसात लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं शहरात शह काटशहाचं राजकारण, आरोप-प्रत्यारोप यांना सुरुवात झालीय. त्यामुळं या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हे प्रकार सुरूच राहिल्यास येत्या काळात पोलिसांचं काम मात्र वाढणार आहे.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये नगरसेवकाची दुकानदाराला मारहाण?, हिललाईन पोलिसांनी दाखल केला मारहाणीचा गुन्हा
crime
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:56 AM

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक विजय चाहू पाटील (Vijay Chahu Patil) यांच्यावर एका व्यापाऱ्याला मारहाण (Beatened) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर आपल्यावरील आरोप हे राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. विजय चाहू पाटील हे उल्हासनगर महापालिकेचे भाजपचे नगरसेवक (Bjp Corporator) आहेत. शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात विजय पाटील यांच्यासह त्यांचा चालक आणि अन्य एका कार्यकर्त्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली. (Hillline police file case against BJP corporator for beating shopkeeper in Ulhasnagar)

व्यापाऱ्याने दुकानासमोर वडापावची गाडी लावण्यास मनाई केल्याने मारहाण

उल्हासनगरच्या कॅम्प 5 ओटी सेक्शनमध्ये व्यापारी नाणिक उर्फ बाबू वाधवा यांचं दुकान आहे. याच दुकानासमोर मोहन नावाच्या इसमानं वडापावची गाडी लावायला सुरुवात केली होती. मात्र व्यापारी नाणिक उर्फ बाबू वाधवा याचा या गाडीला विरोध होता. त्यामुळे 10 फेब्रुवारी रोजी त्याने या गाडीवाल्याला गाडी लावण्यास मनाई केली होती. याप्रकरणी गाडीवाल्याने नगरसेवक विजय पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी गाडीवाल्याला पुन्हा गाडी लावण्यास मनाई करण्यात आल्यानं त्यानं विजय पाटील यांना याची माहिती दिली. त्यानंतर विजय पाटील हे कार्यकर्त्यांसह तिथे आले आणि आपल्याला मारहाण केली, असा आरोप व्यापारी नाणिक उर्फ बाबू वाधवा यानं केलाय.

राजकीय सूडापोटी आरोप केल्याचा पाटील यांचा दावा

दरम्यान, या आरोपांबाबत आम्ही नगरसेवक विजय पाटील यांचीही बाजू जाणून घेतली. विजय पाटील यांच्या म्हणण्यानुसार हे आरोप निव्वळ राजकीय सुडापोटी करण्यात आले आहेत. विजय पाटील हे मागील निवडणुकीत भाजपकडून निवडून आले होते. मात्र आता त्यांची शिवसेनेशी जवळीक वाढली असून फक्त पक्षप्रवेशाची औपचारिकता बाकी राहिली आहे. यातूनच भाजप पदाधिकारी आपल्याला टार्गेट करून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विजय पाटील यांनी केलाय.

उल्हासनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या काही दिवसात लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं शहरात शह काटशहाचं राजकारण, आरोप-प्रत्यारोप यांना सुरुवात झालीय. त्यामुळं या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हे प्रकार सुरूच राहिल्यास येत्या काळात पोलिसांचं काम मात्र वाढणार आहे. (Hillline police file case against BJP corporator for beating shopkeeper in Ulhasnagar)

इतर बातम्या

Mumbai Crime : धारावीत अज्ञातांकडून गोळीबार, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, आरोपींचा शोध सुरु

Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा; प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला दरीत फेकले, चौघांविरोधात गुन्हा दाखल

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.