Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुरा न मानो होली है, एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद मठात, धुलिवंदनाचा आनंद लुटला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज धुळवडीचा आनंद लुटला. त्यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी आज ठाण्यातील आनंद मठात धुळवडीचा आनंद लुटला.

बुरा न मानो होली है, एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद मठात, धुलिवंदनाचा आनंद लुटला
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 5:37 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात धुलिवंदनांचा आनंद लुटला. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठात शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत धुळवड साजरी केली. आनंद मठात आज धुळवडनिमित्त अनोखं आणि उत्साहाचं वातावरण होतं. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांना विरोधकांबद्दल प्रश्न विचारला असता सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना सद्धबुद्धी लाभो, अशी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी आनंद मठात धुलिवंदन साजरी करत असताना ‘टीव्ही 9 मराठी’सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या.

“होळी सगळ्यात मोठा सण आहे. हा सण मोठ्या उत्साहात ठाण्यात टेंभीनाक्याला येऊन आनंद आश्रमात साजरा होतोय. आनंद दिघे यांनी असे सण-उत्सव जोपासले, मोठे केले. ती परंपरा कायम ठेवली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीबाबत प्रश्न विचारला असता, “मी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं सगळ्यांचं आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दरम्यान, राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....