Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime : आधी पत्नीवर प्राणघातक हल्ला, मग स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने दोघेही बचावले

पोलिस सोमनाथच्या शोधात होते. त्यानंतर चार दिवसानंतर रामनगर पोलिस ठाण्याला फोन आला की, सोमनाथने स्वत:वरच गोळी झाडली आहे. पोलिस त्याठिकाणी पोहचले. सोमनाथला जखमी अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पोलिस सोमनाथचा शोध घेत होते.

Dombivali Crime : आधी पत्नीवर प्राणघातक हल्ला, मग स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने दोघेही बचावले
नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 4:41 PM

डोंबिवली : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी (Wife)ला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार पती (Husband)ने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमनाथ देवकर असे आरोपी पतीचे नाव आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील दत्तनगर परिसरात राहणारा सोमनाथ देवकर याने चारित्र्याच्या संशयावरुन त्याच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केला होता. वंदना देवकर असे पीडित पत्नीचे नाव असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नीवर हल्ला करुन सोमनाथ फरार झाला होता. रामनगर पोलिसांनी सोमनाथच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याचा शोध घेत होते. (Husband attempts suicide by attacking wife in Dombivali, Luckily both survived)

स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

पोलिस सोमनाथच्या शोधात होते. त्यानंतर चार दिवसानंतर रामनगर पोलिस ठाण्याला फोन आला की, सोमनाथने स्वत:वरच गोळी झाडली आहे. पोलिस त्याठिकाणी पोहचले. सोमनाथला जखमी अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पोलिस सोमनाथचा शोध घेत होते. तो नाशिकच्या जंगलात पळून गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमचे तपास पथक त्याला शोध होते. मात्र तो काल रात्री घरी आला. घराचे कुलूप तोडून त्याने घरात प्रवेश केला. रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही रिव्हॉल्वर त्याने मध्य प्रदेशातून अवैधरित्या विकत घेतली आहे. त्याचाही तपास सुरु आहे, अशी माहिती रामनगरचे सिनिअर पीआय सचिन सांडभोर यांनी दिली. सोमनाथवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

पोटगीच्या मागणीमुळे नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजेंची हत्या

नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक वादातून पती संदीप वाजेने आपल्या डॉक्टर पत्नीचा काटा काढल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. संदीप वाजे यांचे विवाहबाह्य संबंध होते. डॉ. सुवर्णा यांना घटस्फोट देऊन त्यांना दुसरे लग्न करायचे होते. मात्र घटस्फोटासाठी सुवर्णा यांनी 50 लाख रुपये पोटगीची मागणी केली होती. इतके पैसे देणे शक्य नसल्याने पती-पत्नीमध्ये रोज भांडणे होत असत. याच भांडणातून संदीप यांनी थंड डोक्याने नियोजन करुन सुवर्णा यांची हत्या केली.

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खुनाला पती संदीपने नियोजनबद्ध पद्धतीने मूर्त स्वरूप दिले. त्यांचा खून करून इतर पाच जणांना सोबत घेत पत्नीला जाळले. याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही महत्त्वाची माहिती दिली. त्यावरूनच पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपला बेड्या ठोकल्या आहेत. (Husband attempts suicide by attacking wife in Dombivali, Luckily both survived)

इतर बातम्या

Wardha Incident : वर्ध्यात स्टिल कंपनीत बेल्टमध्ये पडल्याने एकाचा मृत्यू, कामगारांची आर्थिक मदत देण्याची मागणी

Nashik | नगरसेवकांच्या सहलीत नगरसेविकेचा मृत्यू; सुरगाणा येथे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच घाला

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.