“मी वस्तुस्थिती मांडली, झोंबली असेल तर झोंबू द्या;” मनसे आमदाराची मुख्यमंत्री पुत्रावर टीका

खासदारांनी मोठा गाव ते कोपर रस्त्यासाठी 18 कोटी रुपये मंजूर केले. मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्ण्याकरिता 570 कोटी रुपयांची निविदा एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केली आहे.

मी वस्तुस्थिती मांडली, झोंबली असेल तर झोंबू द्या; मनसे आमदाराची मुख्यमंत्री पुत्रावर टीका
राजू पाटील
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 10:22 AM

ठाणे : निवडणूक आली की लोकप्रिय घोषणा करायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर काम पुढे सरकावयाचे. माणकोली खाडी पुलाच्या कामावरून मनसे आमदाराने राजू पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदेसह युवा सेना नेत्यावर खोचक टीका केली. शिवसेना युवा सेना नेते शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे म्हणतात, आम्ही जी कामं करतो ती साऊंड करतो. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी हे सर्व निवडणूक पाहून दाखवायची काम असल्याचं म्हटलं. राजू पाटील म्हणाले, मी बातमी वाचली की माणकोली पूल सुसाट तयार होईल. तिथूनं डोंबिवलीकर सुसाट प्रवास करतील. मेपर्यंत पूर्ण होईल. पण, गेल्या ८ वर्षांपासून हे काम सुरू आहे. हे झाल्यानंतरही तिथं वाहतूक कोंडी होणार आहे. एरोवली ते काठी दहा मिनीटांत अशा घोषणा करतात. पण, एक इंचही जागा भूसंपादन करण्यात आले नाही. मग हे कसल्या बतावण्या करतात. पलावाचा पूल खासदारांच्या हस्ते डिसेंबर २०१८ ला ओपनिंग केलं होतं. अजूनही लटकता आहे.

युवासेनेचे नेते म्हणतात, खासदारांमुळे विकासकामे मार्गी

खासदारांनी मोठा गाव ते कोपर रस्त्यासाठी 18 कोटी रुपये मंजूर केले. मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्ण्याकरिता 570 कोटी रुपयांची निविदा एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केली आहे. रेल्वे फाटकाच्या पुलाचे काम सुरु झाले आहे. खासदारांमुळे विकासकामे मार्गी लागत आहेत. मोठा गाव ठाकुर्ली ते माणकोली खाडी पुलाचे काम 84 टक्के झाले आहे. या पुलाच्या कामाचा विस्तार करणे हा शेवटचा टप्पा आहे. या कामाची पाहणी खासदार डॉ. शिंदे हे करणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी एप्रिल महिन्यात खुला होणार आहे. या पुलाची पाहणी शिवसेना युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी कामाची पाहणी केली.

ज्यांना झोंबली त्यांना झोंबू दे

यावेळी त्यांनी डोंबिवली पश्चिमेत मोठी डेव्हलमेंट होत आहे. आम्ही जी विकास कामे करतो ती टेक्निकली साऊंड असतात. पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी होते. त्याठिकाणी डेव्हलमेंट झाली. त्यानंतर पुलाचे काम सुरु झाले. पलावा जंक्शनचे काम रखडण्यात काही झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यामुळे कामे होत नसल्याची टीका म्हात्रे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे नाव न घेता केली. यावर उत्तर देत माझी सातत्याने मागणी हीच आहे की कल्याण शीळ रोड किंवा मानकोली ब्रीज असू देत त्याला पर्याय उपलब्ध करून त्या प्रकल्पाचा विचार केला पाहिजे. निवडणूक आली की लोकप्रिय घोषणा करायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर काम पुढे सरकवायची या अनुषंगाने केलेली ती मागणी आहे. यात टीका करण्यासारखं काहीच नाही. मी वस्तुस्थिती मांडली आहे. ज्यांना झोंबली त्यांना झोंबू दे असा टोला आमदार राजू पाटील यांनी लगावला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.