Kalyan Crime: कल्याणमध्ये दुचाकी उभी करण्यावरुन वाद, पोलिसाला चौघांची बेदम मारहाण; दोघांना अटक, दोघे फरार

रस्त्यावर दुचाकी उभी करून फोनवर बोलत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. या वादानंतर चौघांनी मिळून मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेदरम्यान सोन्याची चेन आणि काही रोख रक्कमसुद्धा गहाळ झाली आहे.

Kalyan Crime: कल्याणमध्ये दुचाकी उभी करण्यावरुन वाद, पोलिसाला चौघांची बेदम मारहाण; दोघांना अटक, दोघे फरार
कल्याणमध्ये दुचाकी उभी करण्यावरुन वाद, पोलिसाला चौघांची बेदम मारहाण
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 10:02 PM

कल्याण : अंबरनाथमध्ये लष्करी जवानाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये चौघांच्या टोळक्याने पोलिसांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी चौघांपैकी दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असून इतर फरार दोघा आरोपींचा शोध घेतला जात आहे. सुरक्षा यंत्रणांतील जवानांना मारहाण होण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दुचाकी बाजूला उभी करण्यावरून वाद

रस्त्यावर दुचाकी उभी करून फोनवर बोलत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा काही तरुणांसोबत वाद झाला. या वादानंतर चौघांनी मिळून मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेदरम्यान सोन्याची चेन आणि काही रोख रक्कमसुद्धा गहाळ झाली आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांपैकी दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर दोघा आरोपींचा शोध सुरू आहे .

मारहाण झालेला जवान मुंबई पोलीस दलातील

चौघांच्या टोळक्याने मारहाण केलेले पोलिस शिपाई विश्राम महाजन हे मुंबईतील दादासाहेब भडकम मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास गावदेवी रोडवरून कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बँकेच्या एटीएममध्ये घराचा हप्ता भरण्यासाठी दुचाकीवरून जात होते. नेतीवली सर्कलजवळ आले असता त्यांना फोन आला. त्यामुळे फोनवर बोलण्यासाठी त्यांनी गाडी बाजूला लावली. ते फोनवर बोलत होते. इतक्यात तेथे दुचाकीवरुन आणि रिक्षातून आलेल्या चौघांनी महाजन यांना गाडी पुढे घेण्यास सांगितले. यावरून वाद झाला आणि चौघांनी मिळून महाजन यांना बेदम मारहाण केली.

झटापटीदरम्यान दागिने आणि रोकड गहाळ

झटापटीदरम्यान महाजन यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि खिशातील 15 हजारांची रोख रक्कम गहाळ झाली. या घटनेनंतर पोलिस शिपाई विश्राम महाजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोर चौकडीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. चंदन गौड आणि संदीप तुपेरे अशी अटक आरोपींची नावे असून अन्य दोघे हल्लेखोर फरार आहेत. त्यांचाही कसोशीने शोध घेतला जात आहे. (In a dispute over parking a two-wheeler in Kalyan, the four beatened the police)

इतर बातम्या

Boy Suicide: सनदी अधिकाऱ्याच्या मुलाची सहाव्या माजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, घरी कुणी नसताना मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Rajasthan Crime : घरमालकाला ‘हनीट्रॅप’मध्ये फसवले; तीन महिलांसह चौघांना अटक

Mahim Crime: माहीम येथील बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.