Ambernath Firing : अंबरनाथमधील बिल्डर गोळीबार प्रकरणाला कलाटणी, प्रतिस्पर्ध्याला अडकवण्यासाठी रचला गोळीबाराचा डाव

अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगावमधील मुकुल पाल्म सोसायटीत कमरुद्दीन खान याचं ऑफिस आहे. याठिकाणी कमरुद्दीन बसलेले असताना खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या. हा गोळीबार प्रतिस्पर्धी बांधकाम व्यावसायिक नियाज सिद्दीकी याने घडवून आणल्याचा आरोप कमरुद्दीन याने केला होता.

Ambernath Firing : अंबरनाथमधील बिल्डर गोळीबार प्रकरणाला कलाटणी, प्रतिस्पर्ध्याला अडकवण्यासाठी रचला गोळीबाराचा डाव
अंबरनाथमधील बिल्डर गोळीबार प्रकरणाला कलाटणीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 10:37 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये बिल्डरवर झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. कारण ज्याच्यावर गोळीबार झाला, त्या बिल्डर (Builder)ने एका प्रतिस्पर्ध्याला अडकवण्यासाठी स्वतःहून गोळीबार करवून घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळं पोलिसांनी त्याच्याविरोधात कट रचण्यासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून यानंतर हा बिल्डर फरार झाला आहे. अंबरनाथमधील कमरुद्दीन खान या बिल्डरवर 24 एप्रिल रोजी त्याच्या कार्यालयात गोळीबार झाला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी बिल्डरनेच हा गोळीबार घडवून आणल्याची कबुली दिली. (In Ambernath the builder plotted to shoot himself to get his opponent trapped)

प्रतिस्पर्ध्याला अडकवण्यासाठी बिल्डरनेच घडवला गोळीबार

अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगावमधील मुकुल पाल्म सोसायटीत कमरुद्दीन खान याचं ऑफिस आहे. याठिकाणी कमरुद्दीन बसलेले असताना खिडकीतून एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या. हा गोळीबार प्रतिस्पर्धी बांधकाम व्यावसायिक नियाज सिद्दीकी याने घडवून आणल्याचा आरोप कमरुद्दीन याने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कमरुद्दीन याच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद आणि किसन उर्फ सुखविंदर यशवंत सिंग या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमरुद्दीन यानेच स्वतःवर गोळीवर करवून घेतल्याचं समोर आलं. कमरुद्दीन यानं मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद याच्या माध्यमातून किसन उर्फ सुखविंदर यशवंत सिंग याला बंदुक आणि दारुगोळा पुरवला आणि त्यानंतर त्याच्याकडून स्वतःवर गोळीबार करवून घेतला.

बिल्डर फरार असून पोलिसांकडून शोध सुरु

दरम्यान, दोन हस्तकांना पोलिसांनी बेड्या ठोकताच कमरुद्दीन हा मात्र फरार झाला आहे. कमरुद्दीन यांच्यासह अटक केलेला आरोपी मोहम्मद हुसेन उर्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद हे दोघे अंबरनाथमधील आरपीआय नेते नरेश गायकवाड यांच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी होते. मात्र नंतर त्यांची त्यातून सुटका झाली. आता पोलिसांकडून कमरुद्दीन याचा कसून शोध सुरु आहे. (In Ambernath the builder plotted to shoot himself to get his opponent trapped)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.