VIDEO : बदलापूरमध्ये ज्वेलर्स व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरी, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
बदलापूर पश्चिमेला रमेशवाडी परिसरात सखाराम चौधरी यांचं मिलन ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास एक इसम आला आणि त्याने सोन्याच्या चैन आणि ब्रेसलेट दाखवण्यास सांगितलं. त्यानुसार सखाराम चौधरी यांनी 83 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 5 चैन आणि दोन ब्रेसलेट काढून काउंटरवर ठेवले.
बदलापूर : ज्वेलर्स व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील दागिने (Jewellery) चोरून नेल्याची घटना रविवारी संध्याकाळी बदलापुरात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बदलापूर पश्चिमेला रमेशवाडी परिसरात मिलन ज्वेलर्स (Milan Jewellers) या दुकानात ही धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्याने साडे आठ तोळ्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. सखाराम चौधरी असे लुटण्यात आलेल्या सोने व्यापाऱ्याचे नाव आहे. (In Badlapur, a jeweler was robbed by throwing pepper powder in his eye, the whole incident was captured on CCTV)
डोळ्यात मिरची पूड टाकून साडे आठ तोळे लंपास
बदलापूर पश्चिमेला रमेशवाडी परिसरात सखाराम चौधरी यांचं मिलन ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास एक इसम आला आणि त्याने सोन्याच्या चैन आणि ब्रेसलेट दाखवण्यास सांगितलं. त्यानुसार सखाराम चौधरी यांनी 83 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 5 चैन आणि दोन ब्रेसलेट काढून काउंटरवर ठेवले. त्यानंतर चोरट्याने सोन्याची अंगठी दाखवण्यास सांगितल्यानं चौधरी हे अंगठी काढण्यासाठी पाठमोरे वळले असता चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि काउंटरवर दाखवण्यासाठी काढलेल्या 83 ग्रॅम वजनाच्या 5 चेन आणि दोन ब्रेसलेट घेऊन तिथून पोबारा केला. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून हा चोरटा उल्हास नदीच्या दिशेनं पळून गेला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शहाड रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुटले
शहाड रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवत दोन चोरट्यांनी एका प्रवाशाला लुटल्याची धक्कादायक घडली आहे. या दोन्ही चोरट्यांच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राम राऊत नावाचे हे प्रवासी रविवारी संध्याकाळी कामावरुन घरी जाण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकात गाडीसाठी उभे होते. यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याकडील वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र राऊत यांनी प्रतिकार करताच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील रोकड घेऊन पसार झाले. याबाबत अन्य प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली असता राहुल जाधव या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या होमगार्ड साथीदाराच्या मदतीने पाठलाग एका चोराची गठडी वळली. तर दुसरा त्यावेळेस पळून जाण्यास यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी चोरट्याच्या शोधासाठी एक पथक बनवून अखेर दुसऱ्या चोरट्यालाही जेरबंद केले. (In Badlapur, a jeweler was robbed by throwing pepper powder in his eye, the whole incident was captured on CCTV)
इतर बातम्या
Kalyan Crime : शहाड रेल्वे स्थानकात चाकूच्या धाक दाखवून प्रवाशाला लुटणारे दोन चोरटे अटकेत
शेतकऱ्याच्या हातातली दीड लाखांची बॅग हातोहात पळवली, औरंगाबादच्या गंगापूरात भीतीचे वातावरण