Badlapur Crime : बदलापुरात रिकव्हरी एजंटने फोडलं रिक्षाचालकाचं डोकं, कर्जाचे हप्ते थकल्यानं शिवीगाळ करत मारहाण

बदलापूरच्या गांधीनगर परिसरात नितीन मोरे हे रिक्षाचालक राहतात. नितीन मोरे यांनी मनबा फायनान्स कंपनीकडून 40 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाचे हफ्ते ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे या कंपनीतून त्यांना सतत फोन केले जात होते. मात्र नितीन यांनी फोन न उचलल्याने शनिवारी 4 जून रोजी कंपनीचा रिकव्हरी एजंट थेट नितीन यांच्या घरी आला.

Badlapur Crime : बदलापुरात रिकव्हरी एजंटने फोडलं रिक्षाचालकाचं डोकं, कर्जाचे हप्ते थकल्यानं शिवीगाळ करत मारहाण
बदलापुरात रिकव्हरी एजंटने फोडलं रिक्षाचालकाचं डोकंImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:15 PM

बदलापूर : कर्जाचे हफ्ते (EMI) थकल्यानं रिकव्हरी एजंट (Recovery Agent)ने एका रिक्षा चालका (Auto Driver)चं डोकं फोडल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करताच हा रिकव्हरी एजंट पळून गेला. नितीन मोरे असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. कर्जाच्या हफ्त्याबाबत जाब विचारायला आलेल्या रिकव्हरी एजंटमध्ये वादावादी आणि झटापट झाली. यावेळी रिकव्हरी एजंटने नितीन मोरे यांच्या डोक्यात वीट घातली. यानंतर नितीन मोरे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली असता पोलिसांनी संबंधित कंपनीच्या रिकव्हरी एजंट विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. मात्र या घटनेनंतर हा रिकव्हरी एजंट फरार झाला आहे.

मनबा फायनान्स कंपनीकडून घेतले 40 हजारांचे कर्ज

बदलापूरच्या गांधीनगर परिसरात नितीन मोरे हे रिक्षाचालक राहतात. नितीन मोरे यांनी मनबा फायनान्स कंपनीकडून 40 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाचे हफ्ते ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे या कंपनीतून त्यांना सतत फोन केले जात होते. मात्र नितीन यांनी फोन न उचलल्याने शनिवारी 4 जून रोजी कंपनीचा रिकव्हरी एजंट थेट नितीन यांच्या घरी आला. एजंटने नितीन यांना कर्जाचे हप्ते का भरत नाही? याचा जाब विचारत शिवीगाळ केली. यावेळी नितीन आणि या एजंटमध्ये झटापट झाली. यात या एजंटने जमिनीवर पडलेली वीट उचलून नितीन यांच्या डोक्यात मारल्यानं नितीन यांचं डोकं फुटलं. या घटनेनंतर हा एजंट तिथून पळून गेला.

रिकव्हरी एजंट पाठवून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न

दरम्यान, नितीन मोरे यांनी याच कंपनीकडून यापूर्वी सुद्धा दोन वेळा कर्ज घेतलं होतं. या दोन्ही वेळा त्यांनी नियमितपणे कर्ज फेडलं होतं. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे त्यांना कर्जाचे हप्ते भरणं शक्य झालं नाही. त्यामुळे कंपनीने रिकव्हरी एजंट पाठवून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रिकव्हरी एजंटने नितीन यांना केलेली शिवीगाळ आणि मारहाण चुकीची असून या घटनेनंतर फायनान्स कंपन्यांनी त्यांच्या रिकव्हरी एजंट्सना चाप लावण्याची मागणी केली जातेय. (In Badlapur the recovery agent of the finance company assaulted and beat the borrower)

हे सुद्धा वाचा

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.