कल्याण : एकीकडे पैसा, दागदागिन्यांसाठी सख्खे पण वैरी होत असल्याचं चित्र असताना कल्याणमध्ये मात्र माणुसकी (Humanity)चं दर्शन घडवणारी घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट (Bracelet) एका वृद्ध महिलेने सदर व्यक्तीला परत करत या लोभी जगात आजही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दर्शन घडवले. जाहिदा शेख (60) असे या महिलेचे नाव आहे. कल्याणमध्ये नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या केरसुण्या, टोपल्या सुपड्या विकून ही महिला आपला उदारनिर्वाह करते. या महिलेला दुकानासमोर ब्रेसलेट सापडलं. हे ब्रेसलेट सोन्याचं होतं त्याची किंमत दोन लाख रुपये होते. हे ब्रेसलेट स्वतः जवळ ठेवण्याचा मोह तिला झाला नाही कारण तिच्यातला प्रामाणिकपणा जागृत होता. हरवलेले ब्रेसलेट तिने संबंधित इसमाला परत केले. (In Kalyan a woman showed humanity by returning a bracelet worth Rs 2 lakh)
कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात 60 वर्षीय जाहिदा शेख ही आपल्या कुटुंबासह राहते. कल्याण एसीपी कार्यलयाजवळ जाहिदा शेख ही महिला झाडू, सुपड्या, गाळण्यांसह प्लास्टिकचे सामान विकून आपला उदरनिर्वाह करते. तिच्या दोन मुलांचे देखील त्यांच्याच बाजूला स्टॉल्स आहेत. या महिलेला काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रस्त्यात पडलेले सोन्याचे ब्रासलेट सापडले. जहिदा यांनी लालच न दाखवता या ब्रेसलेट बाबत शेजारी असलेल्या वाहतूक पोलिसांना माहिती दिली. तासभराने एक तरुण ब्रेसलेट शोधण्यासाठी या परिसरात आला. त्याने विचारपूस केली असता जाहिदा यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शहानिशा करत हे ब्रेसलेट याच तरुणाचे खात्री करत ब्रेसलेट या तरुणाला परत केलं. हातावर पोट असतानाही सोन्याचा मोह न दाखवता जहिदा शेख यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी तिचा सत्कार केला. (In Kalyan a woman showed humanity by returning a bracelet worth Rs 2 lakh)
इतर बातम्या
Thane Murder : धक्कादायक ! नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्याकडून सुनेची गोळी झाडून निर्घृण हत्या