Kalyan : कल्याण पूर्व भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन
हे स्मारक प्रेरणादायी आणि स्फूर्ती ठरेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला मंगळवारी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.
कल्याण : कल्याण पूर्व भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे ही मागणी गेल्या 13 वर्षापासून होती. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना सोबत घेऊन भव्य स्मारक (Memorial) उभारण्यासाठी पुढाकार घेतला. नगरविकास खात्यातर्फे स्मारकाला 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हे स्मारक प्रेरणादायी आणि स्फूर्ती ठरेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला मंगळवारी नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. (In Kalyan Bhumi Pujan of Dr. Babasaheb Ambedkar Memorial by Urban Development Minister Eknath Shinde)
भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
या दिमाखदार सोहळ्यास भंदे महाथेरे यांच्यासह केंद्रीय मंत्री कपील पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, युवासेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, रिपाई नेते अण्णा रोकडे उपस्थित होते. याप्रसंगी भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकगायक मिलिंद शिंदे आणि नंदेश उमप यांनी भीमगीते गाऊन उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया नाही
आज ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा पार पडली. या सभेत मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला 3 मे पर्यंत अल्टीमेटम दिला आहे. तसेच महाविकास आघाडीवर टीका करीत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. या संदर्भात नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ठाकरे काय बोलले याची माहिती घेऊन बोलतो असे सांगितले. (In Kalyan Bhumi Pujan of Dr. Babasaheb Ambedkar Memorial by Urban Development Minister Eknath Shinde)
इतर बातम्या
Deepali Sayyad : मुलींच्या लग्नात खर्च करण्याऐवजी शिक्षणासाठी करा महिला सक्षम होतील : दीपाली सय्यद