Kalyan Crime : आई आणि मुलीस बेदम मारहाण करुन दागिने, रोकड घेऊन चोरटे पसार, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

मध्यरात्री आईला जाग आली तेव्हा तिने पाहिले की दोन लोक घरात शिरले आहेत. तिने आरडाओरड सुरु करण्याआधीच तिच्या डोक्यावर चोरट्यांनी मारहाण केली. या आवाजाने मुलगी सारिकाही जागी झाली. सारिकाने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी या दोघींना मारहाण करुन घरातील 13 तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन पसार झाले.

Kalyan Crime : आई आणि मुलीस बेदम मारहाण करुन दागिने, रोकड घेऊन चोरटे पसार, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
आई आणि मुलीस बेदम मारहाण करुन चोरटे घरातील दागिने रोकड घेऊन पसार
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 5:11 PM

कल्याण : दोन महिलांना बेदम मारहाण(Beating) करुन घरातील ऐवज लुटून अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. दोन्ही महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलीस(Khadakpada Police) या घटनेचा तपास करीत आहेत. कल्याण डोंबिवलीत घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. पोलीस अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत केलेले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना सुरुच आहेत. कल्याणनजीक आटाळी मानी येथे रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. (In Kalyan, thieves beat up mother and daughter and looted jewelery and money)

आई आणि मुलीला मारहाण करुन ऐवज लुटून नेला

आटाळी मानी या गावात राहणाऱ्या वत्सला चिकणे यांच्या शेजाऱ्याने माघी गणेशाची स्थापना केली होती. वत्सला यांची विवाहीत मुलगी सारिका चव्हाण तिच्या दोन मुलांसोबत वत्सला यांच्या घरी माघी गणपतीला आली होती. काल रात्री गणेश विसजर्नानांतर आई आणि मुलगी, दोन मुलांसह घरी झोपल्या होत्या. मध्यरात्री आईला जाग आली तेव्हा तिने पाहिले की दोन लोक घरात शिरले आहेत. तिने आरडाओरड सुरु करण्याआधीच तिच्या डोक्यावर चोरट्यांनी मारहाण केली. या आवाजाने मुलगी सारिकाही जागी झाली. सारिकाने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी या दोघींना मारहाण करुन घरातील 13 तोळे दागिने आणि काही रोकड घेऊन पसार झाले. खडकपाडा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. खडकपाडा पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र घरात घुसून दोन महिलांना जखमी करुन लुटमारीच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत 100 रुपयांसाठी मित्राकडून मित्राची हत्या

उधार दिलेले 100 रुपये मागितले म्हणून संतापलेल्या मित्राने मित्राची गळफास लावून हत्या केल्याची घटना मुंबईतील दहिसरमध्ये घडली आहे. एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही. हत्येनंतर मृतदेह गादीच गुंडाळून जाळण्याचा प्रयत्नही केला. राजू पाटील असे मयत मित्राचे नाव आहे. तर परमेश्वर बाबूराव कोकोटे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी परमेश्वर कोकोटे हा टेम्पो चालक आहे तर मयत राजू हा गॅरेजमध्ये काम करायचा. दोघेही एकमेकांना 8 वर्षापासून ओळखत होते. अनेकदा एकत्र बसून जेवण करायचे, दारु प्यायचे. पोलिसांनी परमेश्वर कोकोटे याला अटक केली आहे. (In Kalyan, thieves beat up mother and daughter and looted jewelery and money)

इतर बातम्या

Panvel Crime : पनवेलमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या पती-पत्नीचा रेल्वे अपघातात मृत्यू, आपटे गावावर शोककळा

मैत्रिणीच्या आत्महत्येमुळे डॉक्टर पत्नीनेही जीवन संपवलं? ग्रुपमधल्या इतरांनाही धक्का, नांदेडच्या आत्महत्यांचं गूढ उकलेना!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.