बरं झालं खरी वस्तुस्थिती यायला लागलीय; यात बऱ्याच लोकांचा हात असू शकतो; एनसीबी कारवाईवरून जयंत पाटलांची शंका
बरं झालं लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती यायला लागलीय. हे प्रकरण अधिकच गंभीर आहे. यात बऱ्याच लोकांचा हात असू शकतो. (jayant patil taunt bjp over ncb action)
ठाणे: बरं झालं लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती यायला लागलीय. हे प्रकरण अधिकच गंभीर आहे. यात बऱ्याच लोकांचा हात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी क्रुझ ड्रग्ज पार्टी आणि एनसीबी कारवाईवर व्यक्त केली.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही शंका व्यक्त केली. भाजपचे केंद्रसरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करतेय हे आज टिव्हीवर ऐकल्यावर व पाहिल्यावर लक्षात येते आहे, असे पाटील म्हणाले. आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली होती त्यांना पकडून नेण्यात भाजपचे लोक पुढे होते. त्यानंतर अशी पैशाची मागणी होत असेल तर बरेच लोक यामध्ये सहभागी असण्याची शक्यताही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.
ते अमली पदार्थ कोणी ठेवले?
एनसीबीवर झालेले आरोप गंभीर आहेत. ते अमली पदार्थ कोणी ठेवले? त्यात कितपत खरे आहे आणि त्यासाठी पैशाची मागणी होत आहे हे सर्व गंभीर आहे. भाजप पैसे उकळत असल्याचे या वरून दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जे गेले ते परत येत आहेत
मी आजपासून ठाण्यानंतर परवा पालघर, सिंधुदुर्गाची बैठक घेणार आहे. उद्या सिंचन भवन येथे आढावा घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं. पुणे, पिपरी चिंचवड या ठिकाणचे अनेक लोक आमच्या पक्षात येत आहेत. जे आमच्याकडून गेले ते देखील येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
फक्त पवारांसाठी काम करा
मीरा- भाईंदर इथे राष्ट्रवादी पूर्वपदावर येईल आणि पुन्हा जुने दिवस परत येतील. राष्ट्रवादीला इथे स्कोप आहे असे अनेक सर्व्हे सांगतात. त्यामुळे आपल्या सर्वांचा एकच नेता आहे ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब… तुम्हाला फक्त पवारसाहेबांसाठी काम करायचे हे लक्षात ठेवा आणि कामाला लागा, अशी साद जयंत पाटील यांनी मीरा भाईंदरमधील कार्यकर्त्यांना घातली. मीरा – भाईंदर विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज घेतला त्यावेळी ते बोलत होते.
मतमोजणीची तारीख डोक्यात ठेवून काम करा
आपला नेता सर्वात जास्त अनुभवी आहे. अगदी विरोधकांना विचारले तरी ते सांगतील पवारसाहेब मोठे नेते आहे. त्यामुळे मागचा कालखंड पाहिला तर अनेक जण आज पवारसाहेबांच्या विचारांनी प्रभावित होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करू इच्छितात. त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले. मतमोजणीची तारीख डोक्यात ठेवून लोकांच्या छोट्या – मोठ्या कामांची पूर्तता करा. आरोग्याशी संबंधित कामे… त्यांच्या रेशनकार्डची कामे… वॉटर मीटर, गटाराच्या प्रश्नांची सोडवणूक करा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
येणार्या काळात बऱ्याच गोष्टी घडतील
1999ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाने सर्वत्र आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. तीच घोडदौड मीरा-भाईंदरमध्ये ही कायम ठेवली म्हणून सुरुवातीचे बरेच काळ इथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मधल्या काळात इथे सत्तांतर झाले. पण आपल्याला येत्या काळात ही परिस्थिती बदलायची आहे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले. स्थानिक नेत्यांच्या भ्रष्टाचाराला लोकं कंटाळली आहेत. लोकांना इथे बदल हवा आहे. येणार्या काळात बऱ्याच गोष्टी घडतील. फक्त आपली एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. मला खात्री आहे आपण इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 24 October 2021https://t.co/ZSWBOUGZP6#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2021
संबंधित बातम्या:
‘खासदाराला साधा अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं’, गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला
ईडी म्हणजे आता पान तंबाखूच्या दुकानासारखी, उद्या माझ्याही घरी येतील, प्रणिती शिंदेंची खोचक टीका
(jayant patil taunt bjp over ncb action)