क्लस्टरवरून जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा; म्हणाले, या हव्यासापोटी क्लस्टर योजना
१५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्लस्टरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
गणेश थोरात, प्रतिनिधी, ठाणे : आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास म्हणजे क्लस्टर योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणा येथे झाला. क्लस्टरच्या योजनेतून पहिल्या टप्प्यात दहा हजार घरांची निर्मिती केली जाईल. दीड हजार हेक्टरवर ही महत्वाकांशी योजना राबवली जात आहे. १५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्लस्टरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
पैशाच्या हव्यासापोटी या प्रकारची क्लस्टर योजना अंमलात आणली गेली. ही योजना पुढील 50 वर्षे पूर्ण होऊ शकत नाही, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवत त्यांना टोमणाही हाणलाय.
असे बोलल्याचे आठवत नाही
काल मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या भाषणात आपण विधानसभेच्या गच्चीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धमकी दिली. त्यानंतर ठाण्यातील क्लस्टरला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चालना दिल्याचं म्हंटलं होत. त्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, मी जेव्हापासून राजकारणामध्ये आहे तेव्हापासून त्यांनी कुठून उडी मारेन, असे बोलल्याचे आठवत नाही. त्यांनी सांगावं ते कुठे बोलले असा टोला हाणत एकप्रकारे त्यांची खिल्ली उडवली.
कितीही गुन्हे दाखल करा
माझ्यावर दाखल होणारे गुन्हे मंत्र्यांच्या दबावामुळे होत असल्याचा आव्हाडांनी केला आरोप. पोलिसांवर कितीही दबाव आणून गुन्हे दाखल करा. मला फरक पडत नाही. मी कोणाला घाबरत नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सर्व उमेदवार यांना भाजपच्या चिन्हावरच त्यांचे उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार आहे. आज ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्हाला कमळ निशाणी वर लढवावं लागेल. कारण तुमच्याकडे निशाणी राहणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला दिला.