जितेंद्र आव्हाड यांचे ठाणे पालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; ऑडिओ क्लीप व्हायरल
Jitendra Awad's Serious Allegation Against Thane Municipal Officials; Audio clip viral
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि सुबोध ठाणेकर (Subodh Thanekar) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. पालिका आयुक्त सुबोध ठाणेकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. अवैध बांधकामांना संरक्षण दिल्याचा सुबोध ठाणेकर यांच्यावर आरोप आहे. सुबोध ठाणेकर यांनी पैसे घेतल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आव्हाड आणि ठाणेकर यांच्यातील ऑडिओ क्लीप व्हायरल झाली.
जितेंद्र आव्हाड : जितेंद्र आव्हाड यांनी कारवाई करायला सांगितल्याचं रोहिदास पाटील यांना का सांगितलं. पाटील यांनी मला असं सांगितलं.
सुबोध ठाणेकर : नाही साहेब.
जितेंद्र आव्हाड : रोहिदास पाटील यांच्या बिल्डिंगच्या बाजूला तुम्हाला इतर अनधिकृत बिल्डिंग दिसल्या नाही का?
सुबोध ठाणेकर : हो, सर त्यांच्यावर पण केली कारवाई.
जितेंद्र आव्हाड : आता काय करणार तुम्ही.
सुबोध ठाणेकर : नाही सर पहिले तेच टार्गेट केलंय. नवीन बांधकाम सुरूच करू द्यायचं नाही.
जितेंद्र आव्हाड : ते ठिक आहे. पण, जे झालंय ग्राऊंड प्लस सेव्हन त्याला बघू पण नका. म्हणजे ते पूर्ण पैसे कमवतील.
सुबोध ठाणेकर : नाही तसं नाही आहे.
जितेंद्र आव्हाड : तुम्ही रोहिदास पाटील यांच्याकडून २० लाख रुपये घेतले.
सुबोध ठाणेकर : हे काहीही आरोप करताय.
जितेंद्र आव्हाड : देणाऱ्या माणसाला उभा करू का समोर. तुम्ही कुणाच्या हातून पैसे घेतले. माहीत आहे का तुम्हाला. काय येड समजता का लोकांना. जरा आवरत घ्या. हे पैसे काय वरती नाही घेऊन जायचे आहेत. चौकशी लागली तर धूर निघेल धूर. सर्वात बदनाम होतील ती तुमची पोरं. तुमचा बाप बदनाम होता.
सुबोध ठाणेकर : येस सर
जितेंद्र आव्हाड : येस सर, येस सर करू नका. रोहित पाटलाला फोन करा. मी तुमच्याकडे पुरावा घेऊन येईन ज्या माणसानं २० लाख रुपये दिले त्याला. उद्यापासून तुमची आणि माझी पर्सनल लढाई सुरू. फोन ठेवा.