अजित पवारांइतका घाणेरडा जातीयवादी कुणीही नाही; माजी सहकाऱ्याचा गंभीर आरोप
Jitendra Awhad on Ajit Pawar : अजित पवार यांच्यावर शरद पवार गटाच्या नेत्याने टीकास्त्र डागलं आहे. अजित पवार जातीयवादी नेते असल्याची टीका करण्यात आली आहे. नेमकं काय म्हणाले कुणी केलं हे विधान? मराठा आरक्षण आणि बांग्लादेशच्या प्रश्नावर ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...
राज ठाकरे यांनी आज जालन्यात बोलताना अजित पवार यांच्याबाबत एक विधान केलं. अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. त्यांचं कधी विधान ऐकलं नाही, असं ते म्हणाले. याचबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. अजितदादा किती जातीयवादी आहे हे मी जवळून बघितलं आहे. एससी एसटी ओबीसी या जातींच्या गोष्टींनाच बरोबर कट रचला जायचा. तुमच्या इतका घाणेरडा जातीयवादी कुणीही नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
बांगलादेश कशामुळे बुडाला आरक्षणाच्या प्रश्नामुळे बुडाला? शेवटी वंचितांना शोषितांना वरतीच येऊ दिलं नाही तर तो एक दिवस दबलेला असतो तो क्रांती करून निघून जातो. पाच पाच वर्ष जर तुम्ही आवाज दाबून ठेवला तर एक दिवस कधीतरी उद्रेक होणारच आहे. एकीकडे म्हणता महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही काय माहिती तुम्हाला आरक्षणाबद्दल… ज्याच्या बापाने गुवाच्या टोपल्या स्वतःच्या डोक्यावरून वाहिल्यात त्यालाच ते दुःख समजेल. त्या त्या जातीचे दुःख त्या त्या जातीला माहिती एसी मध्ये राहून तुम्हाला समजणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“आरक्षण संपवायचं असेल तर…”
105 जणांचा रक्त वाहिल्यानंतर जी मुंबई आपल्याला मिळाली त्या मुंबईची आणि महाराष्ट्राची तुम्हाला काही किंमतच राहिली नाही.एससी एसटीला जे क्रिमिलियर लावण्याचे नाटक आहे. अत्यंत घाणेरड आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचा फेरविचार करावा आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे पाऊल टाकले आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आरक्षण संपवायचं असेल तर संपवून टाका, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
वक्फ बोर्डबाबत आव्हाड म्हणाले…
बाळ्यामामा म्हात्रे कामाला लागला हे मला बरं वाटलं. त्याची नेमणूक वक्फ बोर्डवर देखील झाली आहे. भारताच्या लोकशाहीचे मी अभिनंदन करतो. कारण विरोधी पक्ष स्ट्रॉंग असल्याने केंद्राला आणि बोर्डचा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा लागला. आता पुन्हा केंद्र सरकारने त्यावर समिती देखील नेमली…वक्फ बोर्ड हे राजे महाराजे मुसलमानांच्या जमिनी संस्थेला देण्यात आल्या त्याला वक्फ म्हणतात. त्या कुठल्या ना कुठल्या सामाजिक कार्यासाठी वापराव्या अशी अपेक्षा असते….मात्र शासनाने असा निर्णय घेतल्याने त्या जमिनी ह्यांना कोणालाही देता येणार होत्या. ते आम्ही होऊ देणार नाही. उद्या ख्रिश्चन आणि महार वतनाच्या जमिनी देखील हे कोणालाही देतील, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.