मर्द की औलाद…; जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद

Jitendra Awhad on NCP Ajit Pawar Group : जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ही पाकीटमारांची टोळी आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर...

मर्द की औलाद...; जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद
जितेंद्र आव्हाड, अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 9:46 AM

निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यात सुरु आहे. अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ही पाकीटमारांची टोळी आहे, पाकीटमारांची. तुमच्यात हिंमत होती , अजित पवार मर्द की औलाद होते तर म्हणाले असते शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतली. मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो असं म्हटलं असतं तर आपण त्याला मर्द म्हणतो. तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी ती चोरून माझी पार्टी पार्टी म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव काय आहे हे माहीत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

अजित पवार गटाची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. पराभव समोर दिसत असल्याने जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. कदाचित त्यांना लोकशाही मान्य नसल्याने असं वक्तव्य त्यांनी केलं असावं. पक्ष हा कोणतीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. तर लोकांनी निर्माण केलेलं संगठन आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. लोकांनी दादाचं नेतृत्व स्विकारलेलं आहे. आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांनी असं वक्तव्य केलं असावं. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे, असं सूरज चव्हाण म्हणालेत.

जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा

जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि आरएसएसच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना नथुराम गोडसेची औलाद म्हणत देशात अमन आणि शांती बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार केंद्र सरकारचा पाठिंबा सात दिवसांच्या आत मागे घेतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

महाविकास आघाडीच्या सरकारात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि आर्थिक सहाय्यता देण्याचे आश्वासन दिले.राज्यात महंगाई वाढली त्यात सरकारची तिजोरी देखील रिकामी बदलापुर हत्याकांडावर भाजपा सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. मतदात्यांना जागरूक राहून जुल्मी विरोधी लढाईत सहभागी होण्याचं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.