राधे राधे म्हणा, … म्हणू नका, याचं समर्थन आपण करणार आहात का, जितेंद्र आव्हाड यांचा कुणाला सवाल
राजकारणात उत्तरं द्यायला काही नसतं तेव्हा भावनात्मक व्हा. हा फॅसिझमचा मुळ बेस आहे. त्यांच्यातली धर्म, जात जागी करा.
निखिल चव्हाण, प्रतिनिधी, ठाणे : जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सणसणीत प्रत्युतर दिलंय. बावनकुळे हे फार हुशार आहेत. माझ्या ओटात काय, पोटात काय, मनात काय हे बावनकुळे यांना दिसायला लागलं. याचा अर्थ ते प्राच्यपंडित ज्योतिष्य झालेले दिसताहेत. त्यांनी ज्योतिष्याचा महाविद्यालय काढावा, असा सल्ला त्यांनी दिला. पालघरमध्ये एक ज्युनिअर आयएएस आली. ती आत्ताच आली. ती आदिवासी मुलांना सांगते तुम्ही राधे राधे म्हणा. तुम्ही राधे राधे म्हटलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तुम्ही जय आदिवासी म्हणू नका. जय आदिवासी म्हंटल तर काहीही मिळणार नाही, असं सांगते. हा प्रश्न मी विधानसभेतही उपस्थित केला होता.
आम्ही खंडोबाला जाऊन भंडारा उधळतो. तुळजाभवानीला जाऊन बोकळाचा बळी देतो. तशी प्रत्येकाची एक आपआपली संस्कृती आहे. बंजारा भेटले की, जय सेवालाल महाराज म्हणतात. पण, राधे राधे म्हणा, जय आदिवासी म्हणू नका, याचं समर्थन आपण करणार आहात का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला.
त्यांना आदिवासी म्हणत नाही. त्यांना वनवासी म्हणतात. त्याला कारण आहे. आपल्याला व्यवस्था मान्य नाही. आदिवासींचं समाजातलं स्थान मान्य नाही. आपण जय आदिवासी या शब्दाला आक्षेप घेता का, राधे राधे म्हणा, याचं समर्थन करता काय, याचं उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले.
मी स्टंटमॅन आहे. मी अडव्हेंचर मॅन आहे की, कुठला जेंटलमॅन आहे. याचं सर्टीफिकेट यांच्याकडून घ्यावं लागेल का, असा सवालचं जितेंद्र आव्हाड यांनी केला.
मी पोपट नाही, येवढ सांगू शकतो. पण, यावरचं बोललं जातं कारण दुसरं काय बोलणार. प्रचंड बेकारी, प्रचंड भाववाढ, प्रचंड अस्वस्थता, संविधान जाते की काय ती भीती आहे. या देशात हुकुमशाही येते की, काय अशी भीती. म्हणून तर औरंगजेब हा जेब, तो जेब, असं सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
राजकारणात उत्तरं द्यायला काही नसतं तेव्हा भावनात्मक व्हा. हा फॅसिझमचा मुळ बेस आहे. त्यांच्यातली धर्म, जात जागी करा. म्हणजे ते वेगळ्या मार्गानं जातात.
एखादा समाज तुमच्यासोबत येत नसतो.तेव्हा त्यांच्या आदर्शावर हल्ला केला जातो. तो मोडून टाका म्हणजे ती माणसं तुमच्यामागे यायला लागतात. आदर्श उद्धस्त करा. म्हणजे ती लोकं मेंढरासारखे तुमच्यामागे येतात, असं एक तत्वज्ञ सांगतो, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.