Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalicharan Maharaj : “धर्मवीर” पाहून कालीचरण महाराजांना रडू कोसळले, तर पुन्हा म्हणाले जो हिंदू हित की बात करेगा…

ठाण्यातील मल्हार चित्रपट गृहात महेश कदम यांच्या स्वामी फाऊंडेशन सवस्थेच्या वतीने कालीचरण महाराज यांना बोलावण्यात आले होते. चित्रपट पाहून झाल्यावर बाहेर पडताना कालीचरण महाराज यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

Kalicharan Maharaj : धर्मवीर पाहून कालीचरण महाराजांना रडू कोसळले, तर पुन्हा म्हणाले जो हिंदू हित की बात करेगा...
कालीचरण महाराज (प्रातिनिधिक फोटो )Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 6:01 PM

ठाणे : राज्यात आजच धर्मवीर (Dharmaveer) चित्रपट रिलीज झाला आहे. या चिपटाचे ओपनिंग धडाक्यात झाले आहे. हा चित्रपट पाहायला शिवसैनिकांची (Shivsena) तसेच राज्यातील नागरिकांची झुंबड उडाली आहे. या चित्रपटाला अनेक राजकीय आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांनीही उपस्थिती लावली. त्यात कालीचरण बाबा (Kalicharan Maharaj) यांनाही अमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा हिंदूत्वाची हाक दिली. तर हा चित्रपट पाहून त्यांना रडू कोसळले. युवकांनी आदर्श ठेवला पाहिजे आपल्या डोळ्यासमोर, धर्मवीर म्हणून ते महान होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवत असे, हे धर्मवीर आनंद दिघे होते. देवीला प्रसन्न करणे दुसऱ्यांचे भले करणे. आनंद दिघे यांना राजश्री राज आणि ऋषी म्हणजेच राजश्री म्हणतो, जगत कल्याणकारी आयुष्य दिघेंचं होतं, अशी प्रतिक्रिया यावेळी कालीचरण महाराजांनी दिली.

कालीचरण महाराजांचे डोळे पाणावले

तसेच ते धर्मासाठी जगले, कर्मयोगातून भवानी मातेला प्राप्त केले, असेही ते म्हणाले. ठाण्यातील मल्हार चित्रपट गृहात महेश कदम यांच्या स्वामी फाऊंडेशन सवस्थेच्या वतीने कालीचरण महाराज यांना बोलावण्यात आले होते. चित्रपट पाहून झाल्यावर बाहेर पडताना कालीचरण महाराज यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळ या ठिकाणी देखील भेट देऊन नतमस्तक झाले. हा चित्रपट आजच रिलीज झाल्याने मंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावत पहिली शो पाहिली आहे.

राजाचे काम आहे शस्त्र उचलणे

तसेच हिंदुत्वावर बोलताना ते म्हणाले, राजाचे कर्तव्य असते प्रजाचे सवरक्ष साठी शस्त्र उचलणे. सर्व देव, धर्मासाठी देवाने देखील शस्त्र उचलले. जो हिंदू हित की बात करे उसिको हम सब वोट करे हा आमचा स्पष्ट अजेंडा आहे. स्वातंत्रवीर सावरकर म्हणतात राजनीती करणाचे हिंदूकरण आवश्यक आहे. का तर हिंदूंना गत वैभव पाहिजे. भारत माता पुन्हा सोन्याची चिडीया झाली पाहिजे. राम मंदिर हे साधुंनी दिले नाही तर ते राजा ने दिले आहे. 370 कलम राजाने हटवले, त्यामुळे हिंदू बाहेरून काहीच करू शकत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. तर कट्टर हिंदुवादी राजा राजनीतीमध्ये आवश्यक आहे. हिदू राजकारण करण्याचा आमचा प्रयत्न नाही तर हिंदू राजकारणी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यावेळी कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.