चोरीचे दागिने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई

एक इसम चोरी केलेले दागिने कल्याण बाजारपेठ परिसरात एका सोनाराच्या दुकानात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचचे कर्मचारी विनोद चन्ने यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचत दागिने विकण्यासाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेतलं.

चोरीचे दागिने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला, कल्याण क्राईम ब्रांचची कारवाई
चोरीचे दागिने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:23 PM

कल्याण : रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन खेचून पळून गेलेला चोरटा चोरी (Theft) केलेले दागिने सोनाराकडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांच (Crime Branch)ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनाराच्या दुकानाबाहेर सापळा रचून या चोरट्याला अटक केली. संतोष तेलंग असं या चोरट्याचं नाव असून संतोष हा रिक्षा चालक होता. तीन महिन्यांपूर्वी तो आजारी पडल्याने तो रिक्षा चालवू शकला नाही. त्यामुळे रिक्षाचे थकलेले कर्ज व कुटुंब कसे चालवायचे या आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करला होता. (Kalyan Crime Branch arrests rickshaw puller for stealing old woman’s chain)

कल्याण क्राईम ब्रांचने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले

एक इसम चोरी केलेले दागिने कल्याण बाजारपेठ परिसरात एका सोनाराच्या दुकानात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचचे कर्मचारी विनोद चन्ने यांना पेट्रोलिंग दरम्यान मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचत दागिने विकण्यासाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने काही दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका वृद्ध महिलेची चैन खेचून पळ काढला होता. हीच चैन विकण्यासाठी आलो असल्याची कबुली दिली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई

संतोष तेलंग असं या चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली चैन हस्तगत केली आहे. यानंतर या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री करून घेत पोलिसांनी संतोष तेलंग याला अटक केली आहे. संतोषने याआधी अशा प्रकारे चोरी केली आहे का याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान संतोष हा रिक्षा चालक होता रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होता. तीन महिन्यांपूर्वी तो आजारी पडला. आजारपणामुळे तो रिक्षा चालवू शकला नाही. त्यामुळे रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्याच्यासमोर होता. आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करला. (Kalyan Crime Branch arrests rickshaw puller for stealing old woman’s chain)

इतर बातम्या

Solapur Scam : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळनेर शाखेत मोठा अपहार, बँकेतील चौघांवर कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Crime | देवेंद्र फडणीविसांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्लानी फोन टॅपिंग केल्याचा वकिलांचा आरोप

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.