Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण

कल्याण, डोंबिवली आणि परिसरातमध्ये वीज नसल्यानं लोकांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय.

Kalyan Dombivali No Electricity : पहाटे 4 वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली परिसराची बत्ती गुल! नागरीक हैराण
कल्याण -डोंबिवलीत विजेअभावी खेळखंडोबाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 7:36 AM

कल्याण : कल्याण, डोंबिवली आणि परिसरातमध्ये वीज (Kalyan Dombivali No Electricity) नसल्यानं लोकांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. बहुतांश ठिकणी पहाटे 4 वाजल्यापासून लाईट गेल्याने नागरिक हैराण झालेत. तांत्रिक कारणास्तव वीज पुरवठा (Electricity Supply) खंडीत रहाणार असल्याचे वीज वितरणकंपनी कडून सांगण्यात येतंय. आधीच वाढलेल्या तापमानात पहाटेपासून वीज नसल्यामुळे लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. वीज वितरण कंपनीनं वीज पुरवठा खंडीत राहणार असल्याचं सांगितल्यानं लोकंही हवालदिल झाले आहेत. आधीच राज्यावर वीज (Electricity Crisis in Maharashtra) संकटांचे ढग दाटलेले आहेतच. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीहीही विजेची उधळपट्टी नको, असं म्हणत विजेसंदर्भात काळजीचा सूरही आळवला होता. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी कल्याणमध्ये वीज नसल्यामुळे लोकांना लोडशेडिंग सुरु झालंय की काय?, असा प्रश्नही उपस्थित झालाय.

पहाटे चार वाजता गेलेली लाईट सकाळी सात वाजून गेल्यानंतरही आलेली नव्हती. नेमका तांत्रिक बिघाड काय झाला आहे, हे देखील कळू शकलेलं नाही. सध्या बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं कळतंय.

कोळशाचा तुटवडा..

अपुरा कोळसा पुरवठा सध्या गंभीर समस्या बनला आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावतीमुळे वीज संकटाचे धग अधिकच गडद होऊ लागले असल्याचं उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीहीह म्हटलं होतं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर एकूण 27 देशांमध्ये कोळसाचा तुटवडा आहे. त्यामुळे वीज प्रश्न गंभीर बनलाय. अखंडीत वीज उपलब्ध व्हावी, यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा सरकारकडून विचारही सुरु आहे.

जागरुकचा गरजेची..

वाढत्या वीजप्रश्नावरुन मुख्यमंत्र्यानीही राज्यातील जनतेचं लक्ष वेधून घेतलं होतं. विजेच प्रश्न गंभीर बनल्यानं प्रत्येकानं जागृत होण्याची गरज मुख्मयंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. वीज बचतीबाबत राज्यातील ग्रामपंचायतींपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना सतर्क राहण्याचेही निर्देश देण्यात आले होते. तसंच सार्वजनिक ठिकाणी विजेचा गैरवापर किंवा अतिवापर होणार नाही, यासाठी जागरुकता बाळगण्याचीही गरज उद्धव ठाकरेंनी बोलताना व्यक्त केली होती. विजेची उधळपट्टी कशी टाळता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

लोडशेडिंगची भीती..

दरम्यान, वाढत्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अघोषित लोडशेडिंग सुरु झालंय की काय, असा प्रश्न आता विचारला जातोय. राज्यातील वेगवेगळ्या भागात बत्ती गुल होण्याचं प्रमाणही लक्षणीय प्रमाणात वाढल्याचं सांगितलं जातंय. त्या पार्श्वभूमीवर विजेअभावी अनेक कामांनाही फटका बसतोय. तर लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.

पाहा महत्त्वाच्या हेडलाईन्स

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.