Kalyan News : कल्याणमध्ये धोकादायक दुमजली इमारत कोसळली! सुदैवानं जीवितहानी नाही
Kalyan Building Collapse News : दुर्घटना झालेल्या चाळीला लागूनच असलेल्या एका दोन मजली इमारती वरही पालिकेने ही कारवाई केली होती.
कल्याण : कल्याणच्या (Kalyan News) रामबाग परिसरातील धोकादायक इमारत कोसळी. मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवतहानी झाली नाही. तर दोन घरांचं किरकोळ नुकसान झालंय. तसंच इमारतीच्या मलब्यामुळे नागरिकांचा रहदारीचा रस्ताही बंद झालाय. दरम्यान, अनेक वेळा अर्ज देऊन पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संपात व्यक्त केला आहे. रहदारीचा रस्ता बंद झाल्याने स्थानिक रहिवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वीच एक घर कोसळलं (Home collapsed) होतं. चाळीतील तळमजला अधिक 1 मजला असं घर कोसळल्यानं पतीचा मृत्यू झाला होता. तर एक महिला जखमी झाली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून (KDMC News) धोकादायक इमारतींच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवातही केलेली. या कारवाईदरम्यान अर्धवट पाडकाम बंद पाडल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यामुळे इमारतच्या तळमजल्याची भिंत कोसळून दुर्घटना घडली, असा आरोप लोकांनी केला. मात्र कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.
कारवाईचा बडगा, पण…
कल्याण पश्चिम रामबाग मेनरोड पवनबारच्या समोर 29 जूनला पहाटे 6 वाजेच्या सुमारास तळ अधिक एक मजला असलेले चाळ टाईप घर कोसळले होते. यामध्ये 60 वर्षीय सूर्यभान काकड यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी उषा काकड ही गंभीर झाली होती. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलत रामबाग परिसरातील धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू केली होती.
अशाच प्रकारे दुर्घटना झालेल्या चाळीला लागूनच असलेल्या एका दोन मजली इमारती वरही पालिकेने ही कारवाई केली होती. मात्र पालिका कर्मचाऱ्यांचे तोडक कारवाई करताना इमारतीचे वरचे दोन मजले पाडले आणि तळमजला न तोडता काम बंद केले होते.
..तर दुर्घटना टळली असती?
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी कारवाई पूर्ण करणाऱ्यांची मागणी करत पालिकेला अनेक पत्र दिली होती. तरीही पालिका कर्मचारी आणि वार्ड अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष केलं. पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे रविवारी सायंकाळी या इमारतीचा तळमजल्याची भिंती कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र अचानक कोसळलेल्या या भिंतीमुळे दोन घरांचे किरकोळ नुकसान झाले. तर इमारतीच्या मलब्यामुळे नागरिकांचा रहदारीचा रस्ता झाला बंद झाला होता. या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून पालिकेने कारवाई पूर्ण केली असती तर ही दुर्घटना झाली नसती, असा आरोप केले आहे