Kalyan Railway CCTV: तोंड चाकाखाली जाणारच होतं, इतक्यात पाय खेचला म्हणून वाचला! स्थळ – कल्याण स्थानक
Kalyan Railway Station CCTV: गाडीनं वेग पकडल्यामुळे या प्रवासी मधल्यामध्ये अडकला गेला होता. त्याचा तोल जाऊन प्लॅटफॉर्म पूर्णपणे फरफटत गेला.
कल्याण : धावत्या रेल्वेखाली पडलेल्या प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. ही थरारक घटना सीसीटीव्ही (Shocking CCTV Video) कॅमेऱ्यात कैद झाली. एक प्रवासी रेल्वे खाली येता येता थोडक्यात बचावला. कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्न हा प्रवासी करत होता. मात्र या प्रवाशाचा धावती गाडी (Running Express Train) पकडण्याचा प्रयत्न फसला. तोल जाऊन हा प्रवाशी प्लॅटफॉर्म (Railway Platform) आणि गाडीच्या मधल्या जागेतून गाडीखाली येतो की काय, अशी भीती होती. मात्र इतक्यात या प्रवाशावर रेल्वे स्थानकातील सुरक्षा बलाच्या जवानाची आणि एका महिला पोलिसाची नजर पडली. पोलिसांनी तत्काळ या प्रवाशाच्या दिशेनं धाव घेतली. या प्रवाशाच्या जीव महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाच्या प्रसंगावनधानामुळे थोडक्यात बचावला आहे.
…नाहीतर काही खरं नव्हतं!
धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केल्यामुळे रेल्वेखाली हा प्रवासी पडला. मात्र दरावाजाला असलेल्या हॅन्डला प्रवाशानां पकडून ठेवलं. मात्र विचित्र अवस्थेत असताना गाडीनं वेग पकडला होता. त्याचवेळी एक हात सुटला जाऊन हा प्रवाशी रेल्वेखाली येण्याची भीती होती.
हा घटना पाहून प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे प्रवाशांच्या अंगावरही काटा आला होता. दरम्यान, इतक्यात एक सुरक्षा दलातील जवान प्रवाशाच्या दिशेने धावला. एक महिला पोलिस कर्मचारीही व्हिडीओ मदतीसाठी धावल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, गाडीनं वेग पकडल्यामुळे या प्रवासी मधल्यामध्ये अडकला गेला होता. त्याचा तोल जाऊन प्लॅटफॉर्म पूर्णपणे फरफटत गेला. इतक्यात त्याचा चेहरा हा प्लॅटफॉर्म आणि गाड्याच्या मधल्या भागात अडकला. वेळीच जर या प्रवाशाच्या मदतीला कुणी धावलं नसतं, तर काहीच खरं नव्हतं! पण इतक्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर असेलल्या जवानानं या प्रवाशाचे जोरात पाय खेचले आणि त्याला मागे ओढलं. त्यामुळे हा प्रवाशी थोडक्यात बचावलाय.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सुरेश जाधव यांनी केलेल्या या कामगिरीचं सगळ्यांनी कौतुक केलंय. सुरेश जाधव हे मूळचे रेल्वेखाली पडलेल्या प्रवाशी महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या वाकोद येथील रहिवासी आहेत. ही संपूर्ण थरारक घटना पाहून त्यांच्या कर्तव्यदक्षतेला तुम्हीली सॅल्यूट कराल!
पाहा व्हिडीओ :
Video | जीव जाता जाता वाचला! कल्याण रेल्वे स्थानकातील थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, महाराष्ट्र सुरक्षा बदलाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी बचावला, जळगावच्या सुरेश जाधव यांची कौतुकास्पद कामगिरी #Kalyan #cctvfootage #railway @Central_Railway pic.twitter.com/1agHTJFBLc
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2022
इतर बातम्या :
ऑफिसात घुसला साप, कॅबिनेमध्ये साप पाहून एकच थरकाप! पाहा CCTV Video
नगराध्यक्षाची अधिकाऱ्याला मारहाण! संपूर्ण प्रकार CCTV त कैद; मारहाणीचं कारण नेमकं काय?
दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी कोण आहेत?