पतीच्या वाढदिवशी पत्नीकडून पुलाची रंगरंगोटी, आतार्पंयत 27 लाख खर्च करुन शाळा, स्मशानभूमी, अनाथालयांचं कायापालट
कल्याणमध्ये एका वयोवृद्ध महिलेने पतीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वालधूनी रेल्वे उड्डाणपुलाची रंगरंगोटी केली आहे.
कल्याण : कल्याणमध्ये एका वयोवृद्ध महिलेने पतीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत (Kalyan Wife Paint Valdhuni Bridge) कल्याण वालधूनी रेल्वे उड्डाणपुलाची रंगरंगोटी केली आहे. बिना ओम बेनाम असे या महिलेचे नाव आहे. तिने आतापर्यंत स्वखर्चातून 27 लाख रुपये खर्च करुन स्मशानभूमी, शाळा, अनाथालये यांची रंगरंगोटी केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून त्या हे समाजोपयोगी काम करत आहे (Kalyan Wife Paint Valdhuni Bridge).
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण वालधूनी पुलाच्या संरक्षक कठड्यांची रंगरंगोटीचे काम सुरु आहे. गुलाबी आणि लाल रंगाने रंगरंगोटीचे कामं सुरु होती. एक वयोवृद्ध महिलेसह तिचे दोन सहकारी हे काम करत आहेत. सुरुवातीला वाटले की, त्यांना रंगरंगोटीचे कंत्राट दिले गेले असावे. जेव्हा महिलेकडे चौकशी केली तेव्हा वेगळीच कहाणी समोर आली.
उल्हासनगरातील ओटी सेक्शन परिसरात राहणारी बिना ओम बेनाम ही महिला इतक्या मोठ्या पुलाची स्वखर्चातून रंगरंगोटी करत आहे. बेनाम ही तिचे पती कुमार वाधवा यांच्यासोबत गेली 25 वर्षे अमेरीकेत वास्तव्याला होती. तिला रंगरंगोटीची आवड आहे. तिने अमेरिकेतही रंगरंगोटीचे काम केले आहे. त्याठिकाणी तिला चारशे डॉलर मोबदला मिळत होता. तिच्या एका पायाला डबल फॅक्चर असल्याने ती तिच्या पतीसोबत भारतात आली आहे. तिला एक मुलगा आहे. मात्र, तो सध्या अमेरीकेतच वास्तव्याला आहे.
गेल्या आठ वर्षांपासून ती उल्हासनगरात राहत आहे. तिच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यावेळी तिला तिच्या पतीने काही रक्कम भेट दिली होती. ती रक्कम 28 लाख रुपये होती. तिने ती रक्कम बँकेत ठेवली. त्या रक्कमेतून आतार्पंयत तिने 27 लाख रुपयांची रंगरंगोटी सामाजिक बांधिलकी म्हणून केली आहे (Kalyan Wife Paint Valdhuni Bridge).
पुलाला गुलाबी आणि लाल रंग दिल्याने पुलाचे रुप पालटले आहे. आज तिच्या पतीचा वाढदिवस असल्याने तिने त्यासाठी वालधूनी पुलाची रंगरंगोटी केली. तिने स्मशानभूमी, अनाथालये, शाळा रंगविल्या आहेत.
कल्याणमधील प्रकल्पांच्या रखडपट्टीला प्रशासनच जबाबदार, भाजप आमदाराकडून केडीएमसीच्या कामकाजाची पोलखोलhttps://t.co/0AYQq5fFSt#KDMC #RavindraChavan #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
Kalyan Wife Paint Valdhuni Bridge
संबंधित बातम्या :
कल्याणमध्ये कॉंक्रिटीकरणावरुन राजकारण, एकाच रस्त्याचं भाजप आणि शिवसेनेकडून उद्घाटन