मग तालिबानमध्ये जा, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा जावेद अख्तर यांना अजब सल्ला
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत असून या वादात आता केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उडी घेतली आहे. (kapil patil demands apology from Javed Akhtar)
ठाणे: प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत असून या वादात आता केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उडी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद निस्वार्थी भावनेने काम करत आहेत. जावेद अख्तर यांनी चुकीचं विधान केलं असून त्यांनीच तालिबानमध्ये जावं, असा अजब सल्ला कपिल पाटील यांनी दिला आहे. (kapil patil demands apology from Javed Akhtar)
शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर कपिल पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षणाला भाजपचा विरोध नाही. मात्र ते टिकले नाही. राज्य सरकारने हे आरक्षण टिकवले नाही. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण का टिकले नाही? राज्याने सूची निर्माण करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. आपली आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करायला कोर्टाने सांगितलं आहे. तो दिला तर आरक्षण टिकेल. सर्वांचीच ती भूमिका आहे. निवडणुकीआधीच हे आरक्षण मिळायला हवं, असं पाटील यांनी सांगितलं.
जागतिक ज्ञान घ्या
शिक्षकांनी शिक्षण देता देता विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. आता स्पर्धेचे दिवस आहेत. नुसते पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही. तर जागतिक ज्ञान हवे आहे. आताचे शिक्षण आणि पूर्वीचे शिक्षण यात खूप फरक आहे. पूर्वीच्या काळात गुरूला खूप महत्व होते. आता काळ बदलला. पूर्वी शिक्षणाचा व्यवसाय झाला नव्हता. आता शिक्षणाचा व्यवसाय झाला आहे. हे बदललं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
मीही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो
मी देखील जिल्हा परिषद शाळेत शिकलो आणि आता मंत्री झालो. मला माझा शिक्षकांचा अभिमान आहे. मी मंत्री झालो आणि त्यांचा सत्कार त्यांच्या गावात केला. त्यांनी माझ फोन वरून अभिनंदन केले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
साडे चार लाख कोटींचं बजेट
माझ्या खात्याचा एकूण साडेचार लाख कोटींचा बजेट आहे. ग्रामीण विभागासाठी अशी एकूण 18 खाती आहेत. एकूण 2 लाख 69 हजार ग्रामपंचायती आहेत. आता माझा खात्याचे aap येत आहे. सर्व भाषेत ते असेल. स्मार्ट सिटीप्रमाणे स्मार्ट व्हिलेजचीही योजना आणणार आहे. गावात योजना आणल्या तर त्या ठिकाणी पर्यटक येतील आणि ग्रामीण भागाला आर्थिक बळकटी मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे
ऑनलाइन शिक्षणापेक्षा वर्गात बसून शिक्षण कसे घेता येईल यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे. ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यावा, असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागात विकास झाला पाहिजे. रोजगार संधी उपलब्ध झाली पाहिजे. आमच्याकडील फंड हा थेट ग्रामीण भागात जातो. मोठ्या प्रमाणात निधी गावात गेला पाहिजे आणि तो जात आहे. मी सर्व राज्यात जात आहे. त्याठिकाणी व्यवस्थित कामे आणि निधी जातो का हे देखील बघितले जात आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये किती समन्वय आहे याचाही आढावा घेत आहे. तेलंगणा राज्यात पंतप्रधान आवास योजना राबवा, राजकारण करू नका, अशा सूचना मी त्यांना दिल्या आहेत, असं ते म्हणाले. (kapil patil demands apology from Javed Akhtar)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 September 2021 https://t.co/K3p0CpSnuk #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 5, 2021
संबंधित बातम्या:
वसंतदादा पाटलांचं काय झालं?, पवारांवर आता पुस्तकच यायचं बाकी; चंद्रकांतदादांचा पलटवार
Video | ऐकावं ते नवलंच ! पाऊस आला म्हणून थेट पहिल्या मजल्यावर चढला, बैलाला खाली आणण्यासाठी तारांबळ
(kapil patil demands apology from Javed Akhtar)