…तर कल्याण शीळ, मलंगगड रस्ता बंद करणार, माजी नगरसेवकाचा केडीएमसीला मोठा इशारा
तीन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी रस्त्यात साचले आहे. इतकंच नाही तर नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे.
कल्याण (ठाणे) : तीन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी रस्त्यात साचले आहे. इतकंच नाही तर नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे तक्रार केली आहे. केडीएमसीकडे तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने साचलेल्या पावसाच्या पाण्यात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केडीएमसीच्या विरोधात घोषणाबाजी करीत केडीएमसी प्रशासनाचा निषेध केला. केडीएमसीने दखल घेतली नाही तर कल्याण शील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे. तसेच कल्याण मलंगगड रस्त्यावरही रास्ता रोको आंदोलन करुन रस्ता थांबवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
आडीवली ढोकली परिसरात रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यात पाणी साचले आहे. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. याप्रकरणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी वारंवार केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याकडे महापालिकेने लक्ष दिलेले नाही. कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी झाली आहे. त्याचा सगळ्यात जास्त फटका आडीवली ढोकळीतील नागरिकांना बसला आहे. रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचले आहे.
याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने वृत्त प्रदर्शित केलं होतं. पण त्याची दखल अद्यापही केडीएमसी प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही. त्यामुळे केडीएमसीच्या विरोधात संतप्त नागरिकांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह साचलेल्या पाण्यात ढिय्या आंदोलन सुरु केले. आंदोलकांनी केडीएमसी प्रशासनाच्या ढिम्म्यापणाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. तसेच केडीएमसी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
महिलेकडून व्यथा व्यक्त
या परिसरात राहणाऱ्या एका संतप्त गृहिणीने तिची व्यथा माडंली. तिच्या घरात तीन दिवसांपासून पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील टीव्ही, फ्रीज आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साधने खराब झाली आहेत. गटारीचे सांडपाणी तिच्या घरात शिरलं आहे. त्यामुळे घरात राहायचे कसे? असा सवाल तिने केला आहे. तिच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाणी साचल्याने खराब रस्त्यातून घरापर्यंत रिक्षा येत नाही. तिची सून गरोदर आहे. त्यामुळे आम्ही जायचं कुठे आणि राहायचं कुठं? असा संतप्त सवाल हतबल महिलेने उपस्थित केलाय.
…तर आम्ही आत्मदहन करु, आंदोलक महिलेचा इशारा
अन्य एका महिनेदेखील ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना आपली व्यथा मांडली. “कर्ज काढून अंगावरील दागिने विकून आम्ही याठिकाणी घरे घेतली आहेत. आता आम्ही विष खाऊन मरायचं राहिलं आहे. केवळ कोरोनाचे कारण देत महापालिका काहीच पावले उचलत नाही. केडीएमसीने काहीच उपाययोजना केल्या नाही तर आम्ही आत्महदन करु”, असा इशारा महिलेने प्रशासनाला दिला आहे.
कुणाल पाटील नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओत
हेही वाचा :
ठाणेकरांना खूश खबर! बारवी धरण 52 टक्के भरलं; 4 दिवसात धरणाची पातळी 65 मीटरवर