Dombivali Crime : डोंबिवलीतील ‘त्या’ बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा, 40 कुटुंब बेघर

इमारतीचे काम सुरु होताच काही महिन्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली. मात्र ती कारवाई थांबवत ही इमारत पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली आता ही इमारत तयार झाल्यावर 40 कुटुंबे त्या ठिकाणी राहण्यासाठी आले असता केडीएमसीने कारवाई सुरु केली.

Dombivali Crime : डोंबिवलीतील 'त्या' बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा, 40 कुटुंब बेघर
डोंबिवलीतील 'त्या' बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 11:49 PM

डोंबिवली : डोंबिवलीतील दत्तनगर परिसरातील बेकायदा पाच मजली इमारतीवर केडीएमसीने अखेर पाडकामाची कारवाई सुरु केली. या इमारतीत राहण्यास आलेले 40 कुटुंबीय बेघर झाल्याने केडीएमसी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ज्यावेळी ही इमारत बांधली जात होती. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय झोपले होते का असा संतप्त सवाल बेघर होणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बेकायदा बांधकाम असल्याचे सांगत महापिलेकने बेकायदा इमारत घोषित केले

डोंबिवली पूर्व भागातील श्री दत्त कृपा ही पाच मजली इमारत ही वादग्रस्त ठरली होती. बेकायदा बांधकाम असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने या इमारतीला बेकायदा घोषित केले. ही इमारत वादग्रस्त राहिली आहे. इमारतीचे काम सुरु होताच काही महिन्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली. मात्र ती कारवाई थांबवत ही इमारत पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली आता ही इमारत तयार झाल्यावर 40 कुटुंबे त्या ठिकाणी राहण्यासाठी आले असता केडीएमसीने कारवाई सुरु केली. चार तास पोलीस आणि इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये गोंधळ सुरु होता. पोलिसांनी बळजबरीने इमारत रिकामी केली. त्यानंतर तोडक कारवाई सुरु झाली. रहिवाशांनी यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला.

मोडकळीस आलेल्या इमारतीचे रहिवाशांनी स्वखर्चातून केले होते पुनर्बांधकाम

स्थानिक आमदार आणि नगरसेवकामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. बेघर झालो असा आरोप करण्यात आला. महिला रहिवासी रेखा कांबळे यांनी सांगितले की, 1970 सालापासून या जागेवर आमची इमारत होती. इमारत धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली. आम्ही चाळीस कुटुंबिय मिळून ही इमारत बांधली आहे. आम्हाला जबरदस्तीने बाहेर काढले. कोणतीही नोटीस आणि पूर्व सूचना न देता ही कारवाई केली आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी सांगितले, सध्या कारवाई सुरु आहे. संपूर्ण कारवाई झाल्यावर आम्ही याविषयीची माहिती देऊ. मात्र इमारतीचे काम सुरु होते तेव्हा अधिकारी कुठे होते याचे उत्तर देणे टाळले. (KDMC hammers on illegal building in Dombivali, 40 families homeless)

इतर बातम्या

Ulhasnagar: सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट केसमधील साक्षीदाराने साक्ष बदलली, सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.