Ulhasnagar Murder : उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या, मुलाच्या आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून केलं कृत्य

कांचनसिंग आणि मृत मुलाची आई यांच्यात 16 एप्रिल रोजी किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर 20 एप्रिल रोजी कांचनसिंग याने साडेचार वर्षांच्या या चिमुकल्याला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने आपल्या सोबत नेलं आणि अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात एका झाडाझुडपात नेऊन त्याची गळा दाबून हत्या केली.

Ulhasnagar Murder : उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या, मुलाच्या आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून केलं कृत्य
उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 3:48 PM

उल्हासनगर : उल्हासनगरात साडेचार वर्षीय मुलाचं अपहरण (Kidnapping) करून हत्या (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कांचनसिंग पासी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याला सध्या 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. (Kidnapping and murder of a four and a half year old boy in Ulhasnagar)

किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून मुलाची हत्या

उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील हनुमान नगर परिसरात 24 वर्षीय आरोपी कांचनसिंग पासी आणि मृत मुलाचं कुटुंब वास्तव्याला आहे. पीडित मुलाची आई आणि कांचन सिंग हे दोघेही एका बिस्किटाच्या कारखान्यात एकत्र कामाला होते. कांचनसिंग आणि मृत मुलाची आई यांच्यात 16 एप्रिल रोजी किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर 20 एप्रिल रोजी कांचनसिंग याने साडेचार वर्षांच्या या चिमुकल्याला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने आपल्या सोबत नेलं आणि अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात एका झाडाझुडपात नेऊन त्याची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून कांचनसिंग हा उत्तर प्रदेशात त्याच्या मूळगावी जाण्यासाठी रवाना झाला.

आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

इकडे मुलगा बेपत्ता झाल्याने मुलाच्या आई-वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर अंबरनाथ पोलिसांना एका लहान मुलाचा मृतदेह ऑर्डनन्स परिसरात आढळून आला. हा मृतदेह अपहरण झालेल्या मुलाचाच असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. ज्यामध्ये मुलाच्या आईचं आरोपी कांचनसिंग याच्यासोबत चार दिवसांपूर्वी भांडण झाल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी कांचनसिंगचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशात निघाल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांच्या टीमने उत्तर प्रदेशात जाऊन प्रयागराज इथून कांचनसिंग पासी याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आपणच या साडेचार वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. (Kidnapping and murder of a four and a half year old boy in Ulhasnagar)

इतर बातम्या

Nagpur Crime | नागपुरात पारा 43 अंशांपलीकडं, कपिलनगरात संशयास्पद मृतदेह सापडला

Osmanabad | 26 हजारांची लाच घेणाऱ्या दोघांना अटक, उस्मानाबादेत ACB ची कारवाई

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.