Kirit Somaiya: नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? धमकी दाऊदची आहे की शरद पवारांची?; किरीट सोमय्या यांचा सवाल

Kirit Somaiya: नवाब मलिक म्हणजे दाऊद हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब या रस्त्यावर पवारांसोबत आणि न्यायालयाविरोधात काढा मोर्चा.

Kirit Somaiya: नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? धमकी दाऊदची आहे की शरद पवारांची?; किरीट सोमय्या यांचा सवाल
नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? धमकी दाऊदची आहे की शरद पवारांची?; किरीट सोमय्या यांचा सवाल Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 12:21 PM

ठाणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी काय संबंध आहेत? असा सवाल कोर्टाने केला आहे. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आघाडी सरकारला घेरलं आहे. नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? दाऊदची धमकी आहे की शरद पवारांची?; असा सवाल सोमय्या यांनी केली आहे. साडेचार महिने झाले. शिवसेना नेते संजय राऊत रोज मनोरंजन करतात. आता राज्यातील जनता त्यांच्यावर हासत आहे. ऑडिटपासून जे काही ते बोलत आहेत, ते सर्व ऑनलाईन आहे. उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि राऊत हे इश्यू डायव्हर्ट करत आहेत. मलिक दाऊद संबंध बाहेर येणार हे माहीत होतं. म्हणून लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. दाऊदशी संबंध असल्याचं सिद्ध झाल्यानंतरही मलिकांना मंत्रिमंडळातून काढलं जात नाही. धमकी शरद पवारांची आहे की दाऊदची आहे? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी हा सवाल केला आहे.

नवाब मलिक म्हणजे दाऊद हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब या रस्त्यावर पवारांसोबत आणि न्यायालयाविरोधात काढा मोर्चा. नाही तरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालया विरोधात बोलतात. न्यायालयपण पाकिस्तानचे आहे आणि न्यायाधीशपण मोदींचे आहे, असं म्हणायला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली तर आश्चर्य वाटणार नाही, असा टोला सोमय्या यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं

वास्तविकरित्या ही चौकशी न करता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना मलिकांचा सर्व आर्थिक व्यवहार माहीत होता. हा कॉमनसेन्स आहे. उद्धव ठाकरे स्वत: बिल्डर आहेत. त्यांचा मुलगाही बिल्डर आहेत. असे व्यवहार बिल्डर लोकांना लगेच कळतात. त्यांच्या मातोश्रीपासून चार किलोमीटरवर गोवावाला कंपाऊंड आहे. उद्धव ठाकरेंना त्याचा एफआयएस काय होता हे माहीत नाही? उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधवांनी काही वर्षात 53 जुन्या इमारती घेतल्या. मलिक यांनी शंभर कोटींचा टर्न ओव्हरचा प्लॉट घेतला. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. आता उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावं लागणार आहे. तुमचे आणि दाऊदचे काय संबंध आहेत हे सांगावं लागणार आहे. काय बोलणार आहात?, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्रीपदासाठी सर्व गुंडाळलं

1992-93मध्ये दंगली झाल्या. पवार आणि दाऊद एका विमानात गेले असं बाळासाहेब त्यावेळी भाषणात बोलायचे. बाळासाहेबांची ही भाषणं मी ऐकली आहेत. पण उद्धव ठाकरेंनी केवळ मुख्यमंत्रीपदासाठी सर्व गुंडाळून ठेवलं आहे, अशी टीका त्यांनी केली. गुन्हा सिद्ध होण्याचं काही राहिलचं नाही. ठाकरे परिवार आणि सरकारने घोटाळे केले. आता महाराष्ट्रातील जनता शिक्षा करणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एका नेत्यावर कारवाई सुरू

एका नेत्यावर कारवाई सुरू झाली आहे. पाहुया. मी एवढंच सांगतो. एका नेत्याविरोधातील प्रोसेज सुरू झाली आहे. काही दिवसात आपल्यासमोर येणार. समजनेवालो को इशारा काफी है. चारपाच लोक लायनीत आहेत. पण नंबर एकाचाच लागतो, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.