ठाण्यातील किसननगर धोकादायक इमारतींचा केंद्रबिंदू, तब्बल 1086 इमारती धोकादायक

ठाणे शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर हा भाग धोकादायक इमारतींचा केंद्रबिंदू बनला आहे.

ठाण्यातील किसननगर धोकादायक इमारतींचा केंद्रबिंदू, तब्बल 1086 इमारती धोकादायक
dangerous buildings in Thane
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 5:22 PM

ठाणे : शहरात ऐन पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर हा भाग धोकादायक इमारतींचा केंद्रबिंदू बनला आहे. या भागात एकूण 1086 इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच ठाण्यात मागील 24 तासांत झालेल्या पावसामुळे जीनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना आज पहाटे 5 च्या सुमारास वागळे इस्टेट भागातील किसन नगर येथील शिवभुवन इमारतीचा इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही इमारत याआधीच रिकामी करण्यात आली होती. (Kisannagar in Thane is the epicenter of dangerous buildings, with 1086 dangerous buildings)

या घटनेनंतर इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या सहा इमारती पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून रिकाम्या करण्यात आल्या असून येथील तब्बल 174 कुटुंबांना बाजूच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. या इमारतीला लागूनच दुसऱ्या इमारती आहे. त्यामध्ये फारसं अंतर नाही, त्यामुळे ही जुनी असलेली इमारत कशी पाडायची? असा प्रश्न पालिकेपुढे उभा राहिला आहे. दरम्यान, या भागातील धोकादायक असलेल्या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी या ठिकाणची पाहणी केली.

ठाण्यात मागील 24 तासात 184.41 मिमी पावासाची नोंद झाली आहे. आज देखील ठाणे शहरात पावसाचा जोर कायम आहे. अशातच पहाटे पाचच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील किसननगर येथील तळ अधिक चार मजल्याची 30 वर्षे जुन्या शिवभुवन या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सलग दोन वेळा आवाज झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी या संदर्भात तात्काळ ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनेची माहिती दिली.

या घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन विभागाचे पथक आणि अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या आजूबाजूला काही अंतर न ठेवता इमारती उभ्या आहेत. त्यामुळे ही इमारत पडली तर आजूबाजूच्या इमारतींना देखील धोका संभवू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने येथील आजूबाजूच्या सहा इमारती तत्काळ रिकाम्या करण्यास सुरवात केली. येथील एकूण 174 कुटुंबांना तत्काळ बाजूच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. दरम्यान या इमारतीच्या आजूबाजूला अगदी चिकटून सहा इमारती असल्याने सदरची इमारत कशी पाडायची असा प्रश्न पालिकेसमोर आहे. त्यानुसार मनुष्यबळाचा आधार घेऊन ही इमारत पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

इतर बातम्या

उद्घाटनापूर्वीच नवीन कोपरी पुलाला तडे, ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी, मनसेकडून आंदोलन

पैसे भरले तरच मृतदेह मिळेल, खासगी रुग्णालयाची मुजोरी, मनसेच्या दणक्यानंतर वठणीवर

(Kisannagar in Thane is the epicenter of dangerous buildings, with 1086 dangerous buildings)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.