माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण, तक्रार करुनही पालिकेचं दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे मृत मासे खाण्यासाठी भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
डोंबिवली : ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा (Khambalpas) तलावातील गेल्या आठ दिवसात मृत माशांच्या दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका (corporation) दुर्लक्ष करीत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून राहावे लागत आहे. परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिंती स्थानिकांकडून व्यक्त करत पालिकेने उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे. पालिकेने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक (dombivli thakurli news)संताप व्यक्त करीत आहेत. पालिका या प्रकरणाचा कधी बंदोबस्त करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
डोंबिवली खंबाळपाडा येथील तलावात श्री गणपती आणि इतर देवतांचे विसर्जन नित्यनेमाने होत असते. आता उन्हाळा लागल्यामुळे तलावातील पाणी आटले आहे. सदर तलावातील पाण्याचा रंग बदलला असून ते दूषित झाले असावे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. असं सगळं काही असताना, अचानक आठ दिवसांपासून येथे मासे मेल्यानंतर जी भयंकर दुर्गंधी येते. तशी तलावाच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत शोध घेतला असता, या तलावातील मासे मृत अवस्थेत आढळल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे मृत मासे खाण्यासाठी भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या तलावातील पाणी काढून साफसफाई करावी याकरिता काळू कोमास्कर आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र याबाबत कारवाई करण्याबाबत महापालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील यांना विचारले असता, सदर खंबाळपाडा तलावातील मासे मृत झाल्याची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी औषध फवारणी केली असल्याचे सांगितले.