Thane : तर टोल नाक्यावर धिंगाणा घालू,मनसेचा इशारा
ठाण्यातील मुलुंड टोल नाक्यावर (Mulund Toll Naka) कंत्राटी पद्धतीने कित्येक मुले काम करत आहेत. यातील सुमारे 15 ते 20 मुलांना गेले दोन महिन्याचा पगार ठेकेदाराने न दिल्याने या मुलांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे .
ठाणे : सोमवारी मुलांना पगार मिळाला नाही तर टोल नाक्यावर (Toll Naka) धिंगाणा घालू असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) मुलुंड (Mulund) टोल ठेकेदाराला दिला आहे.ठाण्यातील मुलुंड टोल नाक्यावर (Mulund Toll Naka) कंत्राटी पद्धतीने कित्येक मुले काम करत आहेत. यातील सुमारे 15 ते 20 मुलांना गेले दोन महिन्याचा पगार ठेकेदाराने न दिल्याने या मुलांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. गरीब घरातील ही मुले गेले पाच-सहा दिवस ठेकेदाराचा ऑफिसवर दिवसदिवसभर पगार मिळेल या आशेने बसत होती. परंतु ठेकेदार पगार देत नसल्याने मुले हवालदिल झाले.
मनसेने घेतली दखल
खिशात पैसे नाही त्यामुळे या मुलांनी मुलुंड चेकनाक्यावरून चालत घंटाळी येथील मनसेचे कार्यालय गाठले याठिकाणी उपस्थित असलेले मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना ठेकदाराकडून पगार मिळत नसल्याची कैफियत मुलांनी मांडली.याची त्वरित दाखल घेत मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे,मनसे वाहतूक सेना ठाणे शहर अध्यक्ष संदीप साळुंखे,विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण व मनसे कार्यकर्त्यांनी मानपाडा,वरूण गार्डन येथील ठेकेदाराच्या कार्यालयाला धडक दिली.
मुलुंड टोल नाक्यावर धिंगाणा घालू
हे लोक भेटायला गेले परंतु ठेकेदार याठिकाणी नव्हता.त्याचाशी फोनवरून संपर्क साधत मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी थेट इशारा देत या मुलांचे पगार सोमवारी झाले नाही तर मुलुंड टोल नाक्यावर धिंगाणा घालू आणि त्यानंतर जे काय घडेल त्याला ठेकेदार जबादार असले. असा समज दम दिला .यानंतर येत्या सोमवारी मुलांना पगार मिळेल असे आश्वास ठेकेदाराने दिले आहे. परंतु मुलांना पगार मिळाला नाहीतर टोल नाक्यावर धिंगाणा होणार असा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे.