VIDEO | वसईत दोन हजाराच्या नोटांचा खच, नागरिकांची गर्दी

वसईच्या मधुबन परिसरात रस्त्यावर पडलेला नोटांचा खच पाहून लहान मुलं आणि काही नागरिकांनी या नोटा जमा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र नोटा उचलून पाहिल्या, तेव्हा त्या डुप्लिकेट असल्याचं समजलं आणि सर्वांचाच हिरमोड झाला.

VIDEO | वसईत दोन हजाराच्या नोटांचा खच, नागरिकांची गर्दी
वसईत खोट्या नोटांचा खच
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 7:47 AM

वसई : वसईत चक्क 2 हजार रुपयांच्या नोटांचा ‘पाऊस’ पडला आहे. वसईच्या मधुबन परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर दोन हजाराच्या नोटांचा पडलेला खच पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. मात्र या नोटा खोटा असल्याचं स्पष्ट झालं.

काय आहे प्रकरण?

वसईच्या मधुबन परिसरात रस्त्यावर पडलेला नोटांचा खच पाहून लहान मुलं आणि काही नागरिकांनी या नोटा जमा करण्याचाही प्रयत्न केला. मात्र नोटा उचलून पाहिल्या, तेव्हा त्या डुप्लिकेट असल्याचं समजलं आणि सर्वांचाच हिरमोड झाला.

वेब सीरीजची शूटिंग

वसई पूर्व भागातील मधुबन परिसरात दुपारच्या सुमारास सन्नी नावाच्या वेब सीरीजची शूटिंग होती. चित्रिकरणाच्या वेळी 2 हजार रुपयांच्या खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता. शूटिंग संपल्यानंतर रस्त्यावर डुप्लिकेट नोटांचा खच पाहून आजूबाजूच्या नागरिकांसह लहान मुलांनी नोटा पाहण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती.

रस्त्यावर पडलेल्या 2 हजाराच्या नोटांमुळे वसई, विरार, नालासोपारा परिसरात नोटांचा पाऊस पडला, या अफवेचे पेव फुटले होते. मात्र त्या नोटा खोट्या असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला.

पाहा व्हिडीओ :

नाशकात बनावट नोटांची छपाई

दुसरीकडे, लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने बनावट नोटा छापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने आरोपींनी बनावट नोटा छापल्याचं समोर आलं आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सुरगाणामधून 7 जणांना अटक केली. आरोपी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात राहणारे आहेत.

पावणे सात लाखा रुपये किमतीच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. नाशिकच्या विंचूर येथे नोटा छापल्या जात होत्या. नोटांचा आणखी वापर कुठे झाला याचा तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाला म्हणून खोट्या नोटा छापल्या, नाशकात सात जणांना अटक

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांच्या नोटा गायब

नोटा छपाईनंतर विशिष्ट टेबलनंतरच गहाळ, नाशिकच्या करन्सी नोट प्रेस चोरी प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.