सावधान, धोका वाढतोय; ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

म्युकोरमायकोसिस या आजाराची चर्चा सुरु असतानाच ठाणे जिल्ह्यात या आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Maharashtra First Mucormycosis patient found in Thane)

सावधान, धोका वाढतोय; ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण
Thane-COVID-Hospital
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 7:15 AM

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून म्युकोरमायकोसिस या आजाराची चर्चा सुरु असतानाच ठाणे जिल्ह्यात या आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर देखील होत असून यामध्ये रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात समोर आली आहे. सध्या म्युकोरमायकोसिस झालेल्या या महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra First Mucormycosis fungal infection patient found in Thane)

राज्यातील पहिला म्युकोरमायकोसिस रुग्ण

काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एका 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. ती महिला कोरोनावर उपचार घेत असताना तिच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे समोर आले. याची रुग्णालयाने  गांभीर्याने दाखल घेत त्यांच्या काही चाचण्या केल्या. या चाचणी अहवालातून त्यांना म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील पहिला म्युकोरमायकोसिस रुण हा  ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात आढळला आहे.

सहा चाचण्यांनंतर उघड 

सध्या या महिलेला कोरोना या आजारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधला. तसेच रुग्णाची तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे वर आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. तसेच लाईट दाखवल्यानंतर देखील त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. तर, सायनसमध्ये देखील सूज असल्याचे त्या अहवालातून समोर आले आहे. या सर्व बाबींवरून त्या महिलेला म्युकोरमायकोसिस हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले. (Maharashtra First Mucormycosis fungal infection patient found in Thane)

ठाण्यात कोरोना संसर्ग वाढता

ठाणो जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात कोरोना या आजाराचे स्ट्रेन देखील बदलत आहे. त्यात नुकतेच काही जिल्ह्यांमध्ये कोरोना या आजारात रोग प्रतिकार शक्ती खालावलेल्या रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस नावाचा आजार आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. यात रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. हे प्रमाण वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

?म्युकोरमायकोसिस म्हणजे काय??

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत

म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे.

या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते. पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते. डोळा कायमचा निकामी होतो. पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता असते. (Maharashtra First Mucormycosis fungal infection patient found in Thane)

संबंधित बातम्या : 

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

जालन्यात आता लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट; राजेश टोपेंचे आदेश

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.