क्रिकेटच्या ज्ञानामुळे राजकीय ज्ञान वाढले, कोणाला कुठल्या चेंडूवर बोल्ड करायचं ते राजकारणात उपयोगी पडतं : उदय सामंत

"कुणाला कोणत्या चेंडूवर बोल्ड करायचे ते क्रिकेटमध्ये समजायचे. त्याचाच उपयोग आम्हाला राजकारणातही होतोय. क्रिकेट खेळतच आम्ही राजकारणात आलो आहोत. क्रिकेटच्या ज्ञानामुळे आमचे राजकीय ज्ञान वाढले", असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

क्रिकेटच्या ज्ञानामुळे राजकीय ज्ञान वाढले, कोणाला कुठल्या चेंडूवर बोल्ड करायचं ते राजकारणात उपयोगी पडतं : उदय सामंत
मंत्री उदय सामंत
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 3:32 PM

ठाणे : “येऊर येथील इनडोअर क्रिकेट तर्फे जे स्पीच तयार केले आहे ते उत्तम आहे. याचा फायदा मुंबईसह इतरांना देखील होईल. मी कॉलेज जीवनापासून क्रिकेट खेळत आलो आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये खेळत आलो. त्यामुळे त्या बॉलिंगचा आणि बॅटिंगचा उपयोग राजकारणात देखील होतो. लूज बॉलवर कशा पद्धतीने सिक्सर मारला पाहिजे हे मला क्रिकेटमध्ये कळत होते. तसेच कुणाला कोणत्या चेंडूवर बोल्ड करायचे ते क्रिकेटमध्ये समजायचे. त्याचाच उपयोग आम्हाला राजकारणातही होतोय. क्रिकेट खेळतच आम्ही राजकारणात आलो आहोत. क्रिकेटच्या ज्ञानामुळे आमचे राजकीय ज्ञान वाढले”, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

येऊर येथे ग्लोडन स्वान कंट्री क्लब नावाने क्रिकेटसाठी जागतिक दर्जाचे इनडोअर टर्फ सुरु करण्यात आले आहे. या टर्फच्या उद्घाटनासाठी मंत्री उदय सामंत आज ठाण्यात आले होते. यावेळी उद्घटनाला त्यांच्यासोबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि स्थायी समितीचे माजी सभापती सुधाकर चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया

“ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत 50 टक्केच्या आत आरक्षण देण्यासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे. त्याचे विस्तार वृत्तांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन बुजबळ यांनी मांडले आहे. विशेष म्हणजे काल कोकणासाठी 3 हजार 607 कोटी रुपय हे 4 वर्षांसाठी नैसर्गिक आपत्तीसाठी मंजूर केले आहेत. ती देखील समाधानाची बाब आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

नानार प्रकल्पावर प्रतिक्रिया

“मी त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहे. नानारच्या बाबतीतील विषय कधीच संपला आहे. परंतु त्यावेळी शिवसेनेची भूमिका जी होती ती स्थानिक लोकांना जे आवश्यक असेल त्याठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहणार आहेत. मात्र नानार हा विषय आमच्यासाठी संपला आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर प्रतिक्रिया

“मुख्यमंत्री हे महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांनी कोरोना संकट काळात देखील चांगले काम केले आहे. देशाच्या पातळीवर उद्धव ठाकरे यांचा क्रमांक दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ सुटलं आहे. उद्याच्या दौऱ्यामध्ये मी देखील असेल. शंख पिठाचे उद्घाटन देखील उद्याच्या मुहूर्तावर औरंगाबादेतील पैठणमध्ये असणार आहे. विरोधकांनी वर्षानुवर्ष विरोधच करत राहावे. विरोधी पक्ष म्हणून विरोधी बकावरच बसावे. यासाठी माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा”, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.

अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात इन्कम टॅक्स विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया

“अभिनेता सोनू सूदने या देशात चांगले काम केले आहे. कदाचित काही लोकांना वाटले असेल की त्यांची व्होट बँक वाढते. त्याचा भविष्यात त्रास होईल. मला त्याच्यावर काहीही बोलायचे नाही. तिथे एका एजन्सीने कारवाई केली आहे. त्याबाबत स्वतः सोनू सूद समर्थ असेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया

“कोविडच्या काळात बेरोजगारीमध्ये वाढ झालेली आहे. एमपीएससीच्या जागा भरण्यासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. सारथीसारखा विषय देखील महाविकास आघाडीने घेतला आहे. आम्ही 100 टक्के त्यांच्या पाठीशी आहोत”, असं उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा :

Zodiac Signs | या 5 राशींच्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या असतात कणखर, कुठल्याही समस्येला घाबरत नाहीत

‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोहन भागवत, राजनाथ सिंहांना निमंत्रण, 2 फेब्रुवारीला होणार भव्य सोहळा 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.