Kalyan Crime : कल्याणमध्ये आयपीएल मॅचवर सट्टा लावणारे दोघे गजाआड
कल्याण पश्चिमेतील बोरगांवकर कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता आयपीएलचा टी-20 मॅच सुरु होती. आरसीबी आणि आरआर या दोन संघामध्ये सुरु असलेल्या मॅचवर सट्टा लावला जात होता.
कल्याण : आयपीलएल क्रिकेट मॅचवर सट्टा (Betting) लावणाऱ्या दोन सट्टेबाजांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरसीबी आणि आरआर या दोन संघांमध्ये मॅच सुरु होती. या मॅचवर सट्टा लावण्यात येत होता. भावेन अमन आणि मयुर ब्यास अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दोघांकडून ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना आरोपी केले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आाहे. (Mahatma Phule police have arrested two accused for betting on an IPL match in Kalyan)
ऑनलाईन लावला जात होता सट्टा
कल्याण पश्चिमेतील बोरगांवकर कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता आयपीएलचा टी-20 मॅच सुरु होती. आरसीबी आणि आरआर या दोन संघामध्ये सुरु असलेल्या मॅचवर सट्टा लावला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईतील मुलुंडमध्ये राहणाऱ्या भावेन अमन आणि मयुर ब्यास या दोघांना अटक केली आहे.
बुलढाण्यातही आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या चौघांवर कारवाई
आयपीएलमधील एका सामन्यावर खामगावमध्ये जलालपुरा भागात सट्टा लावणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केल्याची घटना मंगळवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने छापा टाकून चार आरोपींसह मोबाईल, लॅपटॉप आणि नगदी रोख रक्कम असा एकूण 82 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखलीसह इतर ठिकाणी आयपीएल सामन्यावर सट्टा लावण्यात येतोय. मात्र याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतंय. (Mahatma Phule police have arrested two accused for betting on an IPL match in Kalyan)
इतर बातम्या
Nagpur Crime | नोकरीच्या निमित्ताने शहरात आणले, बलात्कार करून देहव्यापारात ढकलले, चार आरोपी जेरबंद