Dombivli News : डोंबिवलीत दहिहंडी उत्सवानिमित्त वाहतूकीत मोठा बदल
Krishna Janmashtami 2023 : उद्या संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पुर्णपणे बदल करण्यात आला आहे.
डोंबिवली : डोंबिवली (Dombivli News) शहरातील वाहतूक व्यवस्था पुर्णपणे बदलण्यात आली आहे.उद्याची दहीहंडीची (Krishna Janmashtami 2023) गर्दी विचारता घेता पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेमध्ये पुर्णपणे बदल केला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौक व पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्ता वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Minister Ravndra Chavan), शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे आणि पोलिस प्रशासनाने शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून निर्णय घेतला आहे.
या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता
शहरातील बाजीप्रभू चौकात भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, तर पश्चिमेतील पंडीत दिनदयाळ रस्त्यावर सम्राट चौक येथे शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्याकडून दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी निर्णय घेतला आहे.
भव्य स्वरूपात दहिहंडी उत्सवाचे आयोजन
डोंबिवली शहरात शिवसेना,भाजप व मनसे या पक्षांकडून भव्य स्वरूपात दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरात वाहतूकीचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून वाहतुकीत बदल केला आहे. डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावतीने दहिहंडी उत्सव साजरा केला जातो. तर पश्चिमेतील पंडीत दिनदयाळ रस्त्यावर सम्राट चौक येथे शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्यावतीने दहिहंडी उत्सव आयोजित केला जातो.
विशेष म्हणजे दोन्ही मार्गावर अधिक वर्दळ होत असल्यामुळे पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौक व पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्ता या मार्गावरील वाहतूक 6 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
बाजी प्रभू चौक येथील वाहतूक अंबिका हॉटेलजवळून वळण घेऊन फत्तेह अली रोडने मार्गस्थ होणार आहे. पश्चिमेतील डोंबिवली रेल्वे स्टेशनकडून पंडीत दिनदयाळ रोडने सम्राट चौककडे जाणारी वाहने गणपती मंदिर या ठिकाणी पूर्णपणे बंद राहील. ही वाहने गणपती मंदिराजवळून डावीकडे वळण घेऊन जी.एन. गॅरेज, येरोला सोसायटी मार्गे सम्राट चौकाकडे जाईल असे वाहतूक पोलिस विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.