Manoj Katke : डोंबिवलीतील मनोज कटके हल्ला प्रकरण, भाजपचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण

डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याची घटना 28 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला.

Manoj Katke : डोंबिवलीतील मनोज कटके हल्ला प्रकरण, भाजपचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण
डोंबिवलीत भाजपचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 5:31 PM

डोंबिवली : भाजप कार्यकर्ता मनोज कटके (Manoj Katke) यांच्यावर हल्ला (Attack) होऊन पंधरा दिवस उलटले. मात्र आरोपीला अद्याप अटक केले नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज भाजपा कार्यकर्त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत उपोषण सुरू केलं. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. उपोषण पोलिस ठाण्यात करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्याबाहेर जमा होत घोषणाबाजी करत पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या देत हे उपोषण सुरू केलं. मनोज कटके हल्ला प्रकरणी पोलिस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी भाजपकडून करण्यात आला. (Manoj Katke attack case in Dombivali, BJP’s hunger strike in police station)

घटनेला 15 दिवस उलटूनही हल्लेखोराला अटक नाही

डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याची घटना 28 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र अद्याप हल्लेखोरांचा शोध न लागल्याने भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील जखमी कार्यकर्त्यांची भेट घेत त्याची विचारपूस केली. यावेळी त्यांनी आरोपींवर तात्काळ कारवाई न झाल्यास पोलीस स्टेशनला घेराव घालू असा इशारा दिला होता. मात्र पंधरा दिवस उलटूनही अद्याप हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागला नाही.

भाजपकडून आक्रमक पवित्रा

भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सकाळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे अध्यक्ष रेखा चौधरी डोंबिवली महिला शहराध्यक्ष पूनम पाटील अधिकारी नंदू परब, नंदू जोशी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर समोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. उपोषणाची परवानगी नाकारल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारा शेजारीच उपोषण सुरू केलं. यावेळी राजकीय दबावापोटी पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. हा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. (Manoj Katke attack case in Dombivali, BJP’s hunger strike in police station)

इतर बातम्या

Aurangabad : भाजप आमदार अतुल सावेंसह 23 जणांवर गुन्हे दाखल, फडणवीसांच्या नोटीसीविरोधातील आंदोलन भोवले

प्रेमचा असाही अंत, आधी तिच्या पैशांवर कमाई अन् शेवटी जीव जाईपर्यंत मारहाण, काय घडलं औरंगाबादेत?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.