Metro : ठाण्यात मेट्रोचे काम युध्दपातळीवर, जड वाहनांनाही नो एन्ट्री, वाहतूकीत काय झाला बदल?
मेट्रोच्या कामामध्ये वाहतूकीचा अडसर होऊ नये किंवा कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून घोडबंदर रोडवरील वाहतूक आता अन्य मार्गावरुन वळवण्यात आली आहे. या मार्गावर 24 तास वाहनांची वर्दळ ही ठरलेली असते. याच मार्गावरील माजिवडा नाका, कापूरबावडी जंक्शन येथे तर सातत्याने वाहतूक कोंडी होते म्हणून नाहक त्रास सहन करावा लागतो.
ठाणे : राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत असले तरी त्याचा विकास कामावर परिणाम हा जाणवत नाही. सध्या अनेक शहरांमध्ये (Metro) मेट्रोचे काम सुरु आहे. तर (Thane Metro) ठाण्यामध्ये मेट्रो 4 चे काम हे युध्दपातळीवर पार पडत आहे. काम अखंडपणे सुरु राहण्यासाठी ओवळा सिग्नल ते सीएनजी पंप दरम्यानच्या (Changes in transportation) वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. 10 ऑगस्टपर्यंत येथील खारेगाव, माणकोली टोलनाका, कापूरबावडी जंक्शन या भागात जड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे तर ज्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते तिथे वाहतूक विभागाचा कर्मचारी तैनाक करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर वाहतूकीचे नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
ही आहेत वाहतूकींची ठिकाणी
मेट्रोच्या कामामध्ये वाहतूकीचा अडसर होऊ नये किंवा कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून घोडबंदर रोडवरील वाहतूक आता अन्य मार्गावरुन वळवण्यात आली आहे. या मार्गावर 24 तास वाहनांची वर्दळ ही ठरलेली असते. याच मार्गावरील माजिवडा नाका, कापूरबावडी जंक्शन येथे तर सातत्याने वाहतूक कोंडी होते म्हणून नाहक त्रास सहन करावा लागतो. मेट्रोच्या कामासाठी आता पुन्हा वाहतूकीमध्ये बदल करावा लागणार आहे.
अशी असणारघोडबंदर रोडवरील वाहतूक
मुंबई – नाशिक महामार्गाने घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी जंक्शनला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याला पर्याय म्हणून मुंबई-ठाणेहून घोडबंदरच्या दिशेने जाणारी जड वाहने ही कापूरबावडी वाहतूक शाखेच्या जवळून मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे खारेगाव, टोलनाका, माणकोली, अंजूफाटी कडे जाणाऱ्या वाहनांचा मार्ग सुखकर होणार आहे. तर घोडबंदरकडे जाणारी वाहने ही कापूबावडी जंक्शनपासून कशेरी, अंजूरफाटा येथून मार्गस्थ होणार आहेत.तर नाशिकहून घोडबंदरकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेशबंदी असल्याने ही वाहने माणकोली ब्रीजखालून मार्गस्थ होऊ शकणार आहेत.
मुंब्राकडून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग
मुंब्रा, कळवाकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, माणकोली मार्गे मार्गस्थ होऊ शकतात.