VIDEO : जितेंद्र आव्हाड यांचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

या चर्चांनंतर आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (Jitendra Awhad clarification)

VIDEO : जितेंद्र आव्हाड यांचं 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 10:32 PM

मुंब्रा : ‘अल्लाह को 2011 मे पता था की 2020 में कोरोना आनेवाला है, इसी लिये 2019 में मुंब्रा में नया कब्रस्तान बना’ असं वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांवर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Minister Jitendra Awhad clarification over controversial statement)

“मी जे वक्तव्य केलं, ते देवाला ठाऊक होतं भविष्यात संकट येणार आहे, या अर्थाने केलं होतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुस्लिमबहुल असलेल्या मुंब्रा शहराची लोकसंख्या साडेचार लाख इतकी आहे. मुंब्र्यात 50 वर्ष जुनं एकमेव कब्रस्तान होतं. एका मृतदेहाला दफन केल्यानंतर त्याचं विघटन होण्यासाठी 40 दिवस लागतात. मात्र कोरोनाच्या काळात मुंब्र्यात दिवसाला 35 ते 40 रुग्णांचा मृत्यू होत होता.”

“त्यावेळी मृतदेह दफन करायला जागा नसते. त्यामुळे अक्षरशः चार दिवसांपूर्वी दफन केलेले मृतदेह सुद्धा उकरून बाहेर काढावे लागत होते. त्यावेळची अवस्था ही अतिशय भीषण होती. त्यामुळेच 2019 मध्ये काम पूर्ण झालेल्या कब्रस्तानाचा मी उल्लेख केला. अल्लाहनेच पुढचा विचार करून ठेवला होता, या अर्थाने मी बोललो,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुंब्र्याचं नवं कब्रस्तान 5 एकर परिसरात आहे. तिथे भविष्यात अनेक वर्ष जागेची समस्या उद्भवणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते? 

मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वादग्रस्त आवाहन केलं. अल्लाह को मालूम था 2011 में कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में 2019 में कब्रस्तान बना, असं वादग्रस्त वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आव्हाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. मात्र, आता कोरोनाच्या संकटातील आपले यश – अपयश झाकण्यासाठी त्यांनी थेट अल्लाचाच आधार घेतल्याची टीका होऊ लागली आहे. कोरोनाचे संकट येणार हे अल्लाहला 2011 सालीच दिसले म्हणून 2019ला कब्रस्तान बनले, असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचे व्हिडिओवरून दिसत आहे. आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला.  (Minister Jitendra Awhad clarification over controversial statement)

संबंधित बातम्या : 

‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना’; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.