Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चार महिन्यांपासून बेपत्ता मुलीची सुटका, पळवून नेणाऱ्या आरोपीला बेड्या

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 26 नोव्हेंबर 2021 रोजी शिकवणीला जाते, असं सांगून घरातून गेली होती. मात्र ती परतच आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चार महिन्यांपासून बेपत्ता मुलीची सुटका, पळवून नेणाऱ्या आरोपीला बेड्या
उल्हासनगरात चार महिन्यांपासून बेपत्ता मुलीची सुटकाImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 3:51 PM

उल्हासनगर : मागील चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीला अखेर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी सुखरूप सुटका (Rescue) करून परत आणलं आहे. तसंच या मुलीचं अपहरण (Kidnapping) करून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपहरण झालेल्या मुलीला मानसिक धक्का बसला असून तिला सध्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, मंगेश याने मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आल्याने त्याच्यावर अपहरणासह बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे. (Missing girl released after four months in Ulhasnagar, Accuse arrested)

शिकवणीसाठी गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 26 नोव्हेंबर 2021 रोजी शिकवणीला जाते, असं सांगून घरातून गेली होती. मात्र ती परतच आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मात्र मुलीचा ठावठिकाणा समजत नव्हता. अशातच याच भागात राहणाऱ्या एका तरुणाने तुमच्या मुलीला परत आणायचं असल्यास 50 हजार रुपये द्या, अशी मागणी करणारा फोन मुलीच्या वडिलांना केला.

अहमदनगरमधून मुलीचा सुटका

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता हा फोन मुलीचं अपहरण करणाऱ्या तरुणाच्या मित्राने केल्याचं समोर आलं. तसंच ही मुलगी अहमदनगरला असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अहमदनगरला जाऊन या अल्पवयीन मुलीची सुटका केली आणि तिला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. तर तिला पळवून नेणाऱ्या मंगेश सोनवणे या 19 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली. (Missing girl released after four months in Ulhasnagar, Accuse arrested)

इतर बातम्या

VIDEO : टिटवाळ्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

Sangli Crime : सांगलीत रस्ताच्या कडेला बेवारस स्त्री जातीचे बाळ सापडले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.