आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड; कर्मचाऱ्यांवर पण हल्ला

MLA Ganpat Gaikwad | आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कल्याण तिसाई चौक परिसरातील जरीमरी व्हिजन या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केली. काही कर्मचाऱ्यांना पण बेदम मारहाण केली. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याच संशय आहे.

आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड; कर्मचाऱ्यांवर पण हल्ला
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 11:28 AM

कल्याण | 20 February 2024 : कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. या भागातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे कल्याण तिसाई चौकात कार्यालय आहे. जरीमरी व्हिजन या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केली आहे. पार्किंगच्या वादातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. टोळक्याने कार्यालयात शिरून कार्यालयाची तोडफोड केली. प्रकरणात कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुन्हा दाखल करुन आरोपींचा तपास करण्यात येणार आहे. यापूर्वी पोलीस ठाण्यातच गोळीबाराच्या घटनेने राज्याचे लक्ष वेधले होते. आता या वादाला पण राजकीय किनार असल्याचा सशंय व्यक्त होत आहे. अंतिम तपासातून सत्य समोर येईल.

पार्किंगच्या वादातून घटना

कल्याण पूर्व येथील तिसगाव परिसरात ही घटना घडली. पार्किंगवरुन कुरुबूर झाली. नंतर वाद झाला. त्यानंतर चार ते पाच जणांनी मिळून कार्यालयाची तोडफोड करत कार्यालयामधील काही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचे समजते. कल्याण कोळसेवाडी पोलीस प्रकरणात पुढील तपास करत आहे. पोलीस सूत्रांच्या मते, राजकीय वादातून ही घटना घडलेली नाही. चौकशीअंती माहिती समोर येईल.

हे सुद्धा वाचा

गोळीबाराने हादरले होते कल्याण

यापूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. कल्याण पूर्व मतदार संघाजवळील द्वारली येथील जागेच्या वादातून हा प्रकार घडल होता. हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्याच केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. प्रकरणात आमदार गायकवाड यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीनंतर न्यायलयाचे आदेशाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणात आमदारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांनी पण सरकारवर हल्लाबोल केला होता. आता पुन्हा नव्याने ही घटना घडल्याने पोलीस आता पुढील तपास करत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.