Ravindra Chavan : विकासकामांवरुन आमदार रविंद्र चव्हाण यांची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका

आयरे गावातील एका विकास कामाची पाहणी करत असताना भाजप आमदार यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. आयरे गाव परिसरात एक इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीमध्ये नाना साहेब धर्माधिकरी समाज मंदिर आणि व्यायाशाला होणार आहे. काही वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू आहे.

Ravindra Chavan : विकासकामांवरुन आमदार रविंद्र चव्हाण यांची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका
विकासकामांवरुन आमदार रवींद्र चव्हाण यांची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:52 PM

कल्याण : निधी तुमचा कंत्राटदार पण तुमचा पण कामाला नाकार सुरू आहे. म्हणजे विकास कामे थांबवायची आणि तेथील लोकप्रतिनिधीला सांगायचं की तू आमच्या पक्षात ये हे धंदे बंद करा अशी टीका डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर केली आहे. डोंबिवलीत सुरू असलेल्या समाज मंदिराच्या कामाला दिरंगाई होत असल्याने भाजप आमदार संतापले होते. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आठ नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर भाजपची गोची झाली आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्ला बोल केला आहे. (MLA Ravindra Chavan criticizes MP Shrikant Shinde over development works)

एका विकासकामाची पाहणी करताना चव्हाण यांची टीका

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. डोंबिवलीमध्ये भाजपच्या माजी नगरसेवक मंदार टावरे यांच्या प्रभागात विविध विकासकामाचे लोकार्पण आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आयरे गावातील एका विकास कामाची पाहणी करत असताना भाजप आमदार यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. आयरे गाव परिसरात एक इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीमध्ये नाना साहेब धर्माधिकरी समाज मंदिर आणि व्यायाशाला होणार आहे. काही वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू आहे.

भाजप आमदार रवींद्र चव्हान यांनी आरोप केला आहे की, व्यायाम शाळा आणि समाज मंदिरला नगरसेवक आणि खासदारांनी निधी दिला आहे. ठेकेदार त्यांचाच आहे मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. खासदारांनी ठेकेदाराला समज दिली पाहिजे आणि हे काम लवकरात लवकर झाले पाहिजे. निधी तुमचा ठेकेदार तुमचा, मात्र कामाला नकार सुरू आहे. म्हणजे विकास कामे थांबवायची आणि नगरसेवकांना सांगायचे आमच्यात या, हे धंदे बंद करावेत अशी घणाघाती टीका रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

जितका निधी आला होता तितकं काम पूर्ण

समाज मंदिर आणि व्यायाम शाळेचे काम करणारे ठेकेदार आशुतोष येवले यांचे म्हणणे आहे की, जितका निधी आला होता त्या निधीतून काम पूर्ण झालं आहे. खासदारांच्या दुसऱ्या निधीची वर्कऑर्डर झाली असून काम सुरू आहे. ज्यांना कुणाला वाटतं की काम संथ गतीने सुरू आहे, त्यांनी निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा असे येवले यांनी नमूद केले. (MLA Ravindra Chavan criticizes MP Shrikant Shinde over development works)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याणमध्ये दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल

कमी वयात सद्गुरु बारचा परवाना घेतल्याप्रकरणी अडचणी वाढ! समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.