उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, नारळ, टोमॅटोचा हल्ला, मनसे कार्यालयाबाहेर पोलिसांचा पहारा; ठाण्यातील वातावरण तापलं

ठाण्यातील नौपाडा विभागात मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, नारळ, टोमॅटोचा हल्ला, मनसे कार्यालयाबाहेर पोलिसांचा पहारा; ठाण्यातील वातावरण तापलं
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 12:32 PM

Uddhav Thackeray Convoy Attacked : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पाडला. या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यानंतर आजही ठाण्यातील वातावरण तापलं आहे. सध्या ठाण्यात सर्वत्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी बॅनरबाजीही पाहायला मिळत आहे.

ठाण्यात मनसे विरुद्ध ठाकरे गट यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यानंतर आता ठाण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कालच्या गडकरी रंगायतन या ठिकाणी झालेल्या राड्यानंतर आज ठाणे पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. ठाण्यातील नौपाडा विभागात मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

शुक्रवारी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ भिरकावून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातील बहुतांश ठिकाणी पोलीस पहारा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ठाण्यात पुन्हा बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. ठाण्यात काही अज्ञातांकडून पुन्हा एकदा बॅनरबाजी पाहायला मिळाली. काल ठाकरे गटाच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनर पुन्हा ठाण्यात झळकत आहे.

ठाण्यात झळकणाऱ्या त्या बॅनरवर एक व्यंगचित्र पाहायला मिळत आहे. या व्यंगचित्रात एका बाजूला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी दिसत आहेत. त्याखाली दिल्ली असे लिहिण्यात आले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे पाहायला मिळत आहे. यात उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसमोर लोटांगण घालत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासोबतच या बॅनरवर घालीन लोटांगण, वंदिन चरण, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. यावरुन काल सकाळपासूनच ठाण्यात वातावरण तापले होते.

नेमकं काय घडलं?

शनिवारी 10 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात ठाकरे गटाची सभा पार पडली. या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकला. दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले. ठाण्यात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच अशा प्रकारे काही तरी गोंधळ घातला जाऊ शकतो असा पोलिसांना संशय होता.

सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.