मनसेची बदलापूर, उल्हासनगरची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त, राज ठाकरे यांनी भाकरी फिरवली; नवे आदेश काय?

येत्या 5 जून पासून ठाणे जिल्ह्यात प्रत्येक शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळा सुरू होतील. पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिले जाईल. महिन्यभरात काय काम करतात ते पाहू, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसेची बदलापूर, उल्हासनगरची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त, राज ठाकरे यांनी भाकरी फिरवली; नवे आदेश काय?
raj thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 3:09 PM

निनाद करमरकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बदलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपासून ते ठाणे जिल्ह्यात आहेत. आज त्यांनी अंबरनाथ येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगर शहर कार्यकारिणीच बरखास्त केली. राज ठाकरे यांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला. तर काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. काही लोकांची पक्षात मक्तेदारी झाली होती. आता नवे लोक आल्यावर पक्षाला बळ मिळेल असं मनसैनिक म्हणत होते.

राज ठाकरेंकडून मनसेची बदलापूर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षातील गटबाजीमुळे राज ठाकरेंनी कार्यकर्ता मेळाव्यात हा निर्णय घेतला. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांना बोलायला दिलं. यावेली कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. या तक्रारी प्रचंड होत्या. शिवाय एखाद दोन अपवाद वगळता सर्वच पदाधिकाऱ्यांशी संबंधित होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी ऐकल्यानंतर पक्षातील असंतोष आणि पक्ष न वाढण्याची कारणे राज ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बदलापूरची कार्यकारिणी बरखास्त करण्याची तडकाफडकी घोषणा केली.

हे सुद्धा वाचा

दहा दिवसात नवी कार्यकारिणी

बदलापूरची शहर कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राज ठाकरे यांनी आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पुढील 10 दिवसात नवीन कार्यकारिणी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नव्या कार्यकारिणीत कुणाचा समावेश असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, बदलापूर कार्यकारिणी बरखास्त झाल्याने अनेक पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

उल्हानसगरची कार्यकारिणीही बरखास्त

बदलापूरनंतर उल्हासनगर मनसेची कार्यकारिणी सुद्धा राज ठाकरेंकडून बरखास्त करण्यात आली आहे. आपापसातील हेवेदावे, गटबाजी यामुळे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंकडून ही घोषणा करण्यात आली आहे. तसेच यापुढे पक्षात कोणतीही गटबाजी खपवून घेणार नाही, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बजावलं आहे. पक्षाचं निष्ठेने काम करा. तुमच्या कामाची कदर होणारच. जनतेचे प्रश्न समजून घ्या, तो सोडवा. आपआपसातील हेवेदाव्यात अडकून बसू नका, असंही राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बजावल्याचं सांगितलं जात आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.