दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. (Dahihandi festival)

दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात
avinash jadhav
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 12:35 PM

ठाणे: दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. मात्र, पोलिसांनी जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. (MNS determined to celebrate Dahi Handi, avinash jadhav detained by thane police)

मनसेने दहीहंडी साजरी करता यावी म्हणून नौपाडा येथील भगवती मैदानात स्टेज बांधला होता. या ठिकाणी मनसेचे नेते अविशान जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. तसेच ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आलं होतं. मात्र, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जाधव यांनी घटनास्थळी जावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसे सैनिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी आली होती. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.

दहीहंडी साजरी होणारच

कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन करत दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची तयारी सुरू होती, असं पोलिसांकडून सांगण्यात येतं. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. दहीहंडी साजरी होणारच. आम्ही कायदा हातात घेतला नाही. आम्हाला नियम द्या, आम्ही नियमांचं पालन करून दहीहंडी साजरी करायला तयार आहोत, असं जाधव यांनी सांगितलं.

स्टेज तोडणार

दरम्यान, दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसेने भगवती मैदानात स्टेज बांधला आहे. हा स्टेज पोलिसांकडून तोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. त्यासाठी पोलिसांनी मैदानात कुमक मागवल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मनसे आणि पोलीस आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहे.

दहीहंडी होईल किंवा जेलमध्ये जाऊ

अविनाश जाधव यांना जरी ताब्यात घेतलं असल तरी मनसेकडून ठाण्यात दहीहंडी साजरी करणारच, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. एकतर दहीहंडी होईल किंवा मनसैनिक जेलमध्ये जातील. कोणाकोणाला जेलमध्ये टाकताय त्यांना टाका असं आव्हान मनसेकडून देण्यात आलं.

युवासैनिकांना कोरोना होत नाही का?

दहीहंडी उत्सवावर जरी सरकारने निर्बंध घातले असले तरी मनसेकडून आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मनसेने अगदी मोजक्याच ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन हे आयोजन केलेलं होत. मात्र मुख्यमंत्री फक्त हिंदू सणांवर निर्बंध घालतात. त्यापेक्षा उपाययोजना केल्या असत्या तर बरं झालं असत अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा असो किंवा शिवसेनेने केलेली आंदोलन असो त्यावेळी कोरोना कुठे गेला होता? शिवसैनिकांना कोरोना होत नाही का? असा सवालही त्यानी उपस्थित केला.

दहीहंडी उत्सव रद्द

दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याचं दोन दिवसांपूर्वीच सांगितलं. कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढतो आहे. गेल्या तीन दिवसांचा आलेख पाहिला तर कोरोनाचं सावट वाढतंय असं वाटू लागलंय. तशा केसेसही समोर येऊ लागल्या आहेत. एकाच सोसायटीत 17 जणांचा कोरोना झाला. ठाण्यातही अनेकांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे ठाण्यात यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आलेला असून त्याऐवजी आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

मनसेला हात जोडून विनंती

मनसे किंवा इतर पक्षांनाही हात जोडून विनंती की हे वर्ष दहीहंडी साजरी करु नये, असं सांगताना दहीहंडीत सोशल डिस्टन्स पाळू शकत नाही. मास्क घालू शकत नाही. त्यात भरीस भर म्हणजे शेवटचे तीन थर 14 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांचा असतो. आणि सध्या लहान मुलांना कोरोनाचा धोका सर्वाधिक प्रमाणात आहे, हे आपल्याला माहिती आहे, असंही सरनाईक म्हणाले होते. (MNS determined to celebrate Dahi Handi, avinash jadhav detained by thane police)

संबंधित बातम्या:

कोरोनाचं संकट, दहीहंडी उत्सव रद्द, यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार, प्रताप सरनाईकांचं स्तुत्य पाऊल

ते मध्यरात्री दोन वाजता मद्यधुंद अवस्थेत आले, 10 ते 12 वाहनांची तोडफोड, कल्याणमध्ये दहशत माजवणाऱ्यांचा सुळसुळाट

राज्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता, अंबरनाथमध्ये शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम

(MNS determined to celebrate Dahi Handi, avinash jadhav detained by thane police)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.