एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून राज ठाकरेंची मोर्चेबांधणी, ठाण्यातील गणेश मंडळांना देणार भेट

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आतापासूनच मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे मनसेकडूनही गणेशोत्सवाचे निमित्त साधत विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून राज ठाकरेंची मोर्चेबांधणी, ठाण्यातील गणेश मंडळांना देणार भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 3:24 PM

Raj Thackeray visit Ganpati pandal : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. आता मनसेनेही ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यातील चार विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेट देणार आहे.

विधानसभेची निवडणूक येत्या दोन महिन्यात कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाण्याला राजकीयदृष्ट्या राज्यातच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने ठाण्यात मोठ्या प्रमाणात उडणार असल्याचे दिसत आहे. त्यातच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आतापासूनच मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे मनसेकडूनही गणेशोत्सवाचे निमित्त साधत विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.

ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. राज ठाकरे हे आज ठाण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात येणार आहेत. यावेळ ते चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे. राज ठाकरे गणेश मंडळांना भेट देऊन ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरुवात केली होती. तर दुसरीकडे मनसेनेही आता विधानसभेसाठी ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे विरुद्ध शिंदे गट अशी लढत ठाण्यात रंगताना दिसणार आहे.

मनसेच्या 16 संभाव्य उमेदवारांची नावे

1) शिवडी – बाळा नांदगावकर 2) भायखळा – संजय नाईक 3) वरळी – संदीप देशपांडे 4) माहीम – नितीन सरदेसाई 5) चेंबूर – माऊली थोरवे 6) घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल 7) विक्रोळी – विश्वजित ढोलम 8) मुलुंड – सत्यवान दळवी/राजेश चव्हाण 9) भांडुप – शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर 10) कलिना – संदीप हटगी/संजय तुरडे 11) चांदिवली – महेंद्र भानुशाली 12) जोगेश्वरी – शालिनी ठाकरे 13) दिंडोशी – भास्कर परब 14) गोरेगाव – वीरेंद्र जाधव 15) वर्सोवा – संदेश देसाई 16) मागाठणे – नयन कदम

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.