‘लसीकरण करा, जागा देतो, माणसं पुरवतो, त्यांना पगारही देतो, फक्त लसी द्या, पण केडीएमसीचं दुर्लक्ष’
"केडीएमसी हद्दीतील लसीकरण जास्तीत जास्त व्हावे, यासाठी लसीकरण केंद्राची मागणी केली होती. पण ती पूर्ण झाली नाही", असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले (MNS MLA Raju Patil on KDMC vaccination center).

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सोसायट्यांमध्ये खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून सशुल्क लसीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले होते. त्यानुसार कासाबेला या बड्या गृहसंकुलातील कासाबेला फेडरेशनच्या वतीने आज लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील सोसायटीमध्ये सुरु झालेले कासाबेला हे पहिले केंद्र ठरले आहे. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली खदखद व्यक्त केली (MNS MLA Raju Patil on KDMC vaccination center).
राजू पाटील नेमकं काय म्हणाले?
“केडीएमसी हद्दीतील लसीकरण जास्तीत जास्त व्हावे, यासाठी लसीकरण केंद्राची मागणी केली होती. पण ती पूर्ण झालेली नाही. महापालिककडे मी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. लसीकरण केंद्राचा सगळा सेटअप आणि जागा उपलब्ध करुन देतो, असं सांगितलं होतं. महापालिकेने केवळ लस उपलब्ध करुन द्यायची आहेत. मात्र या मागणीची पूर्तता अद्याप महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही”, अशा शब्दात राजू पाटील यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली (MNS MLA Raju Patil on KDMC vaccination center).
‘घरोघरी जाऊन लसीकरण करावे’
“कासाबेला या सोसायटीतील नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. ते विकत घेऊ शकतात. मात्र या नागरिकांना लसींचा दुसरा डोस मोफत दिला जावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अन्य राज्यात घरोघरी जाऊन लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महापालिकेने ही घरोघरी जाऊन लसीकरण करावे”, अशी मागणी आमदार पाटील राजू यांनी केली आहे.
कासाबेला सोसायटीत पहिल्याच दिवशी 600 जणांचे लसीकरण
यावेळी कासाबेला फेडरेशनचे अशुतोष कुमार उपस्थित होते. कासाबेला या गृहसंकूलात 3 हजार रहिवासी आहेत. लसीकरणाच्या आज पहिल्या दिवशी 600 जणांनी नोंदणी केली आहे. त्या सगळ्यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. आमची सोसायटी प्रथम महापालिकेकडे अप्रोच झाली होती. त्यानंतर महापालिकेने सांगितल्यानंतर सोसायटीने रिलायन्स रुग्णालयाशी टायअप करुन हे लसीकरण केंद्र सुरु केले आहे. त्याचा 3 हजार नागरीकांना लाभ होणार आहे, अशी माहिती सोसायटीतील सदस्यांनी दिली.
हेही वाचा : 100 गुन्हे, पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, हैदर अखेर गजाआड, कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी