Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज आणि शर्मिला ठाकरेंच्या उपस्थितीचं नियोजन, आठशे जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुढे ढकलला

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आठशे जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता (Palghar Mass wedding Raj Thackeray )

राज आणि शर्मिला ठाकरेंच्या उपस्थितीचं नियोजन, आठशे जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुढे ढकलला
राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 7:39 AM

पालघर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांच्या उपस्थितीत आयोजित आठशे जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळा (Mass wedding ceremony) पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत सोहळा पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (MNS postpones Palghar Mass wedding ceremony organised in presence of Raj Thackeray Sharmila Thackeray)

अविनाश जाधवांच्या नेतृत्वात आयोजन

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आठशे जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. येत्या शुक्रवारी म्हणजेच 26 फेब्रुवारीला राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. ठाणे पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

सजलेले मंडप पुन्हा आवरले

या कार्यक्रमाच्या तयारीसाठी दररोज शंभर मनसे कार्यकर्ते रात्रंदिवस नियोजन करत होते. आठशे जोडप्यांना साडी, भांडी, बाशिंग यांचं वाटपही करण्यात आलं होतं. फक्त 26 फेब्रुवारीला जोडप्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार टाकणे, एवढा विधी होणे बाकी होते.

अडीशे बाय अडीशे फुटाचा मंडप आणि भव्य स्टेज तयार करण्यासाठी विक्रमगड तालुक्यात साठ मंडप कामगार काम करत होते. संपूर्ण तयारी दृष्टीक्षेपात आली असताना काल दुपारी राज ठाकरे यांचा हा सोहळा पुढे ढकलण्याचा आदेश आला आणि मंडपात शांतता पसरली. संपूर्ण तयार झालेला मंडप काढण्यासाठी कारागीर कामाला लागले. आता आठशे जोडप्यांना विवाह बंधनात अडकण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

आदिवासी जोडप्यांचा आधीही सामूहिक विवाह

दोन वर्षांपूर्वीही राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीतीत पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये 500 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला होता. दुर्गम भागातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी समाजातील 500 जोडप्यांचा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. बोईसर येथील खैरेपाडा मैदानात हा सामूहिक विवाहसोहळा पार पडला. सुपुत्र अमित ठाकरेंच्या लग्नाची लगबग संपल्यानंतर 9 फेब्रुवारी 2019 च्या मुहुर्तावर सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचं लग्न

(MNS postpones Palghar Mass wedding ceremony organised in presence of Raj Thackeray Sharmila Thackeray)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.